मृतांमध्ये नेमकं कोण कोण आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून बारामतीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. अजित पवारांची बातमी समोर येताच ते फोनवर बोलत रडताना दिसत आहेत.
advertisement
या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही नेत्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी ही ढसाढसा रडले असून ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. याशिवाय हसन मुश्रीफही स्वत:ला सावरू शकले नाहीत. ज्याच्या जीवावर आम्ही राजकारण केलं, तेच दादा आम्हाला सोडून गेले, अशा शब्दांत मुश्रीफांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
advertisement
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Death: 'दादा गेले', युगेंद्र पवारांना अश्रू आवरेना, हॉस्पिटलमधला VIDEO समोर
