TRENDING:

Ajit Pawar vs Murlidhar Mohol : अजित पवारांच्या वर्चस्वाला मुरलीधर मोहोळ देणार खो? दादांविरुद्ध अण्णांनी ठोकला शड्डू!

Last Updated:

Ajit Pawar vs Murlidhar Mohol : मोहोळ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघामार्फत आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ajit Pawar vs Murlidhar Mohol : पुण्यात वर्चस्व कुणाचं? यावरून अनेकदा राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात छुपं युद्ध पहायला मिळतं. अशातच आता पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध पुण्याचे माजी महापौर तसेच केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकले आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar vs Murlidhar Mohol
Ajit Pawar vs Murlidhar Mohol
advertisement

निवडणुकीला राजकीय वळण लागण्याची चिन्हे

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वर्चस्व होतं. मात्र आता मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, तरीही या वेळच्या निवडणुकीला राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार यांनी राज्य कबड्डी संघटनेची साथ सोडून खो-खो संघटनेकडून अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, मोहोळ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघामार्फत आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी दिली आहे.

advertisement

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची ही निवडणूक जाहीर झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. सुरुवातीला मतदानास पात्र असलेल्या संघटनेच्या नावांवरून संघर्ष झाला होता. कबड्डी, कुस्ती आणि जलतरण अशा प्रमुख संघटनांना सुरुवातीला मतदारांच्या यादीतून वगळण्यात आले होते. यावर संघटना आक्रमक झाल्यावर त्यांच्यासह एकूण 31 संघटनांना मतदानासाठी पात्र ठरवण्यात आले. याच दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कबड्डी संघटनेवर प्रशासक (administrator) नियुक्त करण्याचे आदेश दिले. प्रशासकाकडे कार्यभार सोपवण्यापूर्वीच मतदारांची नावे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडे पाठवण्यात आल्याचे संघटनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. जलतरण संघटनेकडून मतदानासाठी मतदारच पाठवण्यात आलेला नाही.

advertisement

12 वर्ष अजितदादांचं वर्चस्व

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

त्यामुळे आता 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत 31 पैकी 30 पात्र संघटनांमधून 60 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू होताच अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. त्यांनी खो-खो संघटनेकडून हा अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवार यांचे चार वर्षांचे तीन कार्यकाळ पूर्ण झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत 11 ऑक्टोबर रोजी संपणार असून, त्यानंतर छाननी आणि त्यावरील आक्षेपांची चौकशी 14 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी 14 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar vs Murlidhar Mohol : अजित पवारांच्या वर्चस्वाला मुरलीधर मोहोळ देणार खो? दादांविरुद्ध अण्णांनी ठोकला शड्डू!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल