मुंबई-नागपूर-मुंबई विशेष एकूण 6 फेऱ्या
गाडी क्रमांक 01005 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही विशेष सेवा 20 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत धावणार आहे. ही गाडी देखील शनिवारी 12.30 वाजता CSMT वरून सुटेल. गाडी क्रमांक 01006 ही नागपूर वरून त्याच कालावधीत असणार आहे. या गाडीच्या विशेष 6 सेवा असणार आहेत. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे कायम राहतील.
advertisement
Mumbai News : मुंबईला आता दूध, भाजीपाला आणखी ताजा मिळणार, तो निर्णय गेमचेंजर ठरणार
पुणे-नागपूर विशेष एकूण 6 सेवा
गाडी क्रमांक 01401 पुणे ते नागपूर गाडी 19 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत, तर नागपूर–पुणे सेवा 20 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या दरम्यान चालेल. या गाडीच्या देखील विशेष 6 सेवा असणार आहेत. ही गाडी दौंड कॉर्ड लाइनमार्गे अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.
अमरावती-पुणे-अमरावती विशेष 6 सेवा
गाडी क्रमांक 01403 आणि 01404 पुणे-अमरावती ही साप्ताहिक विशेष गाडी 20 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान धावणार आहे. 01404 ही गाडी दर रविवारी अमरावती येथून 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.15 ला पुण्यात पोहोचेल. 01403 ही गाडी 20 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत दर शनिवारी असणार आहे. दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड आणि चाळीसगावमार्गे ही सेवा देण्यात येईल.
हिवाळी पर्यटन व सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय सुरू करण्यात आला आहे. या गाड्यांमुळे विशेषत: विदर्भातील नागरिकांना सुटसुटीत प्रवासाची अतिरिक्त सुविधा मिळणार आहे.






