आले आवकेत सुधारणा: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3039 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 922 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 क्विंटल आल्यास 2700 रुपये सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याची आवक कमीच: राज्याच्या मार्केटमध्ये आज 168 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 101 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 12000 ते 16000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल शेवग्यास प्रतीनुसार 20000 ते 30000 दरम्यान सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाचे भाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 2132 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 876 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 13500 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 13 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.