अमरावती : विधवा महिलांना अजूनही समाजात मानाचे स्थान मिळालेले नाही. क्वचित असे कुटुंब असेल जिथे विधवा महिलांना सुद्धा इतर महीलांप्रमाने वागणूक दिली जाते. आपल्या आयुष्यात पुढे काय होणार? हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळं महिलांनी आधीच स्वतः च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहव्यात. आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगावर त्यांना मात करता यावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील सोनल चौधरी काम करत आहेत. सोनल यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी आधार दिला. पण प्रत्येकच विधवा महिलेला पाठिंबा देणारे कुटुंब असेल असे नाही ना? मग आपल्यावर आलेली परिस्थिती जर इतर कोणावर आली तर महिला सक्षम असाव्यात यासाठी काम सोनल काम करत आहेत.
advertisement
अमरावतीमधील वरूड येथील श्रद्धा शिक्षण केंद्राच्या संचालिका सोनल चौधरी यांच्याशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, माझ्या पतीच्या निधनानंतर 14 वर्ष आधी मी माझे माहेर असलेल्या वरूड येथे स्थायिक झाले. त्यानंतर 2013 मध्ये मी श्रद्धा शिक्षण केंद्राची स्थापना केली. श्रद्धा शिक्षण केंद्र स्थापन करण्यामागचे कारण एकच होते. माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्यावर जो प्रसंग ओढवला. त्यातून सावरायला मला खूप त्रास झाला.
कंपनीच्या CEO पेक्षा जास्त कमवतोय जालन्याचा पाणीपुरीवाला, नफा पाहून तोंडात बोटं घालाल
माझ्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे माझ्या कुटुंबाचा सपोर्ट. सगळ्याच बाबतीत मला माझ्या कुटुंबाचा सपोर्ट त्यावेळी मिळत होता. पण, जेव्हा इतर महिलांवर हा प्रसंग ओढवतो तेव्हा त्यांची अवस्था काय होत असेल? हा प्रश्न माझ्या मनात आला. कारण प्रत्येकच व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल असे होत नाही. त्यामुळे मी श्रद्धा शिक्षण केंद्र स्थापन करून महिला आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा, त्यांना सक्षम बनवण्याचा निश्चय केला.
सुरुवातीपासूनच माझ्या श्रद्धा शिक्षण केंद्रात ब्युटी पार्लर, शिवण क्लास, आर्ट अँड क्रॉफ्ट हे क्लासेस चालत होते. 500 रुपये फी घेऊन आम्ही प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट देत होतो. काही वर्षांनंतर त्यात 200 रुपयांनी वाढ करून फी 700 रुपये करण्यात आली. वर्षभरात माझ्या क्लासमध्ये 1200 ते 1500 मुली प्रशिक्षण घेतात. आतापर्यंत माझ्या क्लासमधून गेलेल्या 3 हजारांच्यावर वर मुली स्वतःचे काही न काही काम करत आहेत. काहींचे व्यवसाय मोठे झालेले सुद्धा बघायला मिळत आहे, असे सोनल सांगतात.
विधवा महिलांसाठी विशेष काम
त्याचबरोबर आता सध्या मी विधवा महिलांसाठी काम करत आहे. कारण विधवा म्हटलं की अनेक वेळा त्यांना शुभकार्यात बोलावले जात नाही. यासारख्या अनेक परंपरा लोकं काही भागांत अजूनही पाळत आहेत. त्या महिलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी माझे काही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मी दरवर्षी विधवा महिलांचे हळदी कुंकू आयोजित करते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मिळवून देण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. येत्या काही वर्षात सुवासिनी महिलांप्रमाने विधवा महिला सुद्धा हळदी कुंकवाला जातील यासाठी सुद्धा माझे प्रयत्न सुरू आहे, असेही सोनल सांगतात.