रमेज गुणाजी शिद असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर लहू गुणाजी शिद असं हल्लेखोर भावाचं नाव आहे. आरोपी लहू याने रमेज याच्यावर लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला होता. पण मध्यरात्री पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. एका भावानेच अशाप्रकारे भावावर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कारविणे गावातील शिद कुटुंब गणेशोत्सवासाठी महादेववाडी या आपल्या मूळ गावी आले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिद कुटुंबातील सदस्य गणपती विसर्जनासाठी नदीकाठी गेले होते. त्यावेळी लहू शिद याने या संधीचा फायदा घेतला. आपल्या पत्नी सोबत भावाचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून त्याने घराच्या ओटीवर बसलेल्या रमेश शिद याच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रमेश शिद याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती पाटील आपल्या पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोधमोहिम सुरु केली. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. आरोपीची पत्नी सुवर्णा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.