TRENDING:

Beed News : लग्नानंतर 2 महिन्यातच नवरीचं धक्कादायक कांड; बीडमधील कुटुंब हादरलं, पोलिसात धाव

Last Updated:

लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. लग्न जुळवून देण्यासाठी तब्बल दहा लाख रुपये घेण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. लग्न जुळवून देण्यासाठी तब्बल 10 लाख रुपये घेण्यात आले. विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांत नवरी घरातील दागिने घेऊन पसार झाली. अनेक प्रयत्नांनंतरही ती सासरी नांदण्यास तयार नसल्याने अखेर तीन वर्षांनंतर या प्रकरणात नवरीसह तिच्या कुटुंबीयांवर आणि मध्यस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

या प्रकरणी अभय खोडसकर (वय 39, रा. सारडा संकुल, बीड) यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी अभय यांचे लग्न जमत नसल्याने ते मानसिक तणावात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत रामकृष्ण उपाध्ये, रजनी उपाध्ये, उदय उपाध्ये, पल्लवी उपाध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील उंदरी येथील प्रकाश मैदाने आणि संगीता मैदाने यांनी त्यांच्या गावातील कोमल नावाच्या तरुणीशी लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवले. लग्नासाठी एकूण 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

advertisement

रस्त्यात अडवत 'पोलिसांनी' काढायला सांगितली गळ्यातील सोनसाखळी; पुण्यातील वृद्धासोबत पुढं विचित्र घडलं

तडजोडीनंतर फिर्यादीकडून लग्नापूर्वी आणि लग्नानंतर मिळून एकूण 10 लाख रुपये आरोपींनी स्वीकारले. या आर्थिक व्यवहारानंतर 5 जुलै 2022 रोजी बीड येथे विवाह विधी पार पडला. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असल्याचे भासले. मात्र लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत कोमल हिने घरातील दागिने घेऊन अचानक घर सोडले. सुरुवातीला ती हरवल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे बीड शहर पोलिसांत मिसिंगची नोंद करण्यात आली.

advertisement

नंतर पोलीस तपासात ती माहेरी असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आणि फिर्यादी कुटुंब बुलढाणा जिल्ह्यात तिच्या गावी गेले असता, तिने सासरी नांदण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मिसिंगची नोंद रद्द करण्यात आली. पुढे तक्रार निवारण केंद्रात समुपदेशनही झाले मात्र तेथेही तिने संसार करण्यास नकार दिला. या दरम्यान आरोपींकडून उर्वरित 5 लाख रुपये दिल्यास मुलगी नांदायला येईल, अशी मागणी करण्यात आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ॲक्शन मोडवर, वर्षभराचा प्लॅन तयार, काय करणार?
सर्व पहा

मात्र मुलगी नांदण्यास तयार नसल्याने फिर्यादीने दिलेले 10 लाख रुपये परत देण्याची मागणी केली. पैसे परत न देता उलट दबाव आणि धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या फसवणूक, आर्थिक अपहार आणि धमकीच्या आरोपांखाली नवरी कोमलसह एकूण सात जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News : लग्नानंतर 2 महिन्यातच नवरीचं धक्कादायक कांड; बीडमधील कुटुंब हादरलं, पोलिसात धाव
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल