रस्त्यात अडवत 'पोलिसांनी' काढायला सांगितली गळ्यातील सोनसाखळी; पुण्यातील वृद्धासोबत पुढं विचित्र घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कात्रज-कोंढवा रस्त्यावर पोलीस असल्याची बतावणी करून तीन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली.
पुणे: पुणे शहरात तोतयागिरी करून फसवणूक करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावर पोलीस असल्याची बतावणी करून तीन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली. याप्रकरणी पीडित ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक १० डिसेंबर २०२५ रोजी कात्रज-कोंढवा रस्त्यावरून पायी जात होते. याचवेळी आलेल्या तीन व्यक्तींनी त्यांना अडवलं. त्यांनी स्वतःला पोलीस कर्मचारी असल्याचं भासवत परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवण्याचा सल्ला दिला.
यानंतर हातचलाखी करून त्यांनी सोन्याची साखळी चोरी केली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं ज्येष्ठाच्या लक्षात आलं. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करून त्यांना घाबरवून लूट करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तोतया चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
advertisement
घरफोडी करून चोरी
view commentsदरम्यान पुणे शहरात 'लॉक-ब्रेकिंग' चोरीच्या घटनांनीही पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोथरूड आणि फुरसुंगी या दोन महत्त्वाच्या भागांमध्ये बंद फ्लॅटचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 8 लाख 61 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. नागरिक सुट्ट्यांसाठी घराबाहेर असताना चोरट्यांनी ही संधी साधल्याचे उघड झालं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 15, 2025 6:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रस्त्यात अडवत 'पोलिसांनी' काढायला सांगितली गळ्यातील सोनसाखळी; पुण्यातील वृद्धासोबत पुढं विचित्र घडलं









