TRENDING:

3 वेळा आलं अपयश, पण अखेर साताऱ्याचा स्वप्निल झाले अधिकारी!

Last Updated:

अलिकडे अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांच्यासाठी प्रेरणादायी कहाणी..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, 5 ऑगस्ट: अनेक तरुणांचं स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. अनेकजण त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. सातत्याने येणाऱ्या अपयशावर मात करत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीनं यशाचं शिखर गाठतात. असे अधिकारी आणि त्यांचा प्रवास समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो. असाच संघर्षमय प्रवासातून यशोशिखर गाठणारे अधिकारी म्हणजे बीडमधील सहाय्यक परिवहन अधिकारी स्वप्निल माने होय.
advertisement

साताऱ्यात झालं प्राथमिक शिक्षण

स्वप्निल माने यांचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील बिदाल हे आहे. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या गावीच पूर्ण झालं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन मध्ये सोलापूर येथील भालचंद्र कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. इंजीनियरिंगचं शिक्षण घेत असताना एखाद्या शासकीय क्षेत्रात आपण मोठ्या पदावर अधिकारी म्हणून काम करेल असं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं.

advertisement

अन् माने स्पर्धा परीक्षेकडे वळले

स्वप्निल माने इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत असताना त्यांचा सीनियर विद्यार्थी राज्यसेवेतून डीवायएसपी परीक्षा पास झाला. पुढे माने यांनाही आपण शासकीय सेवेत अधिकारी व्हावं असं वाटू लागलं. डीवायएसपी झालेल्या मित्राचं मार्गदर्शन मिळालं आणि 2011 मध्ये स्वप्निल यांनी राज्यसेवा परीक्षेच्या तयारीला मोठ्या उत्साहात सुरुवात केली.

कॉम्प्युटर इंजिनिअर ते पोलीस उपअधीक्षक, पाहा श्वेता खाडे यांचा प्रेरणादायी प्रवास

advertisement

अपयशानं गाठलं पण जिद्दीनं जिंकलं

2011 साली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाची पूर्व परीक्षा पहिल्याच वर्षी पास झालो. मुख्य परीक्षेत यश आलं नव्हतं. दुसऱ्या परीक्षेत देखील असेच झाले. मात्र तिसऱ्या परीक्षेमध्ये एका मार्काने माझी निवड हुकली. तरीही जिद कायम ठेवली आणि चौथ्यांदा खूप अभ्यास केला आणि मी शेवटी सिलेक्ट झालो, असं स्वप्निल माने सांगतात. ‌

advertisement

8 वर्षांपासून परिवहन विभागात कार्यरत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल मालवणी नॉनव्हेज थाळी, फक्त 150 रुपयांत, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

स्वप्निल माने यांनी इंजिनिअरिंगनंतर परिवहन विभागात काम करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परिक्षेतून ते सहाय्यक परिवहन अधिकारी झाले. आता गेल्या 8 वर्षांपासून ते या विभागात कार्यरत आहेत. त्यांचा ग्रामीण भागातील एक विद्यार्थी ते अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
3 वेळा आलं अपयश, पण अखेर साताऱ्याचा स्वप्निल झाले अधिकारी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल