TRENDING:

कॉम्प्युटर इंजिनिअर ते पोलीस उपअधीक्षक, पाहा श्वेता खाडे यांचा प्रेरणादायी प्रवास

Last Updated:

दुष्काळी भागातील इंजिनिअर तरुणी पोलीस उपअधीक्षक झाली. पाहा प्रेरणादायी प्रवास

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, 3 ऑगस्ट: अनेक तरुणांचं क्लास वन, क्लास टू अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. सध्या काही तरुण जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत असतात. तर कोणाच्या पदरी निराशा देखील येत असते. परंतु, अनेकदा यशानं हुलकावणी देऊनही हार न मानता यशाला गवसणी घालणाऱ्यांची कहाणी अनेकांना प्रेरणादायी ठरते. असाच प्रेरणादायी प्रवास बीडमधील पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे यांचा आहे. साताऱ्यातील दुष्काळी भागातील इंजिनिअर तरुणी जिद्दीने पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत कशी पोहोचली? हेच आपण पाहणार आहोत.
advertisement

दुष्काळी भागातील गाव

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने महिला देखील सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. राज्याच्या आणि देशाच्या पोलीस विभागात देखील अनेक महिला उच्च पदावर कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील इनकुर या दुष्काळी गावातील श्वेता खाडे याही आपल्या मेहनतीने पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत पोहोचल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्या आपलं कर्तव्य बजावत आहेत. परंतु, या पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास संघर्षमय राहिला आहे.

advertisement

इंजिनिअरचं शिक्षण

श्वेता यांचे वडील विष्णू खाडे हे पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून घरची स्थिती जेमतेम होती. श्वेता यांनी बीई कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं. हे शिक्षण घेताना भविष्यात एखाद्या क्षेत्रात मोठ्या पदावर अधिकारी होईन, असं स्वप्नातही नव्हतं. मात्र, मुलीनं शासकीय क्षेत्रात अधिकारी व्हावं असं आई-वडिलांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. बदलत्या काळात मुलीनं स्वत: पायावर उभं राहावं, अशी आई वडिलांची इच्छा होती, असं श्वेता सांगतात.

advertisement

इंजिनियरची नोकरी सोडली अन् झाले अप्पर पोलीस अधीक्षक, दबंग अधिकाऱ्याची स्पेशल कहाणी

मित्रांचे मार्गदर्शन

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय क्षेत्रात नोकरीत कार्यरत होण्याचा निश्चय केला. तेव्हा सोबत असणाऱ्या मित्र परिवराचे मार्गदर्शन लाभले आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2014 च्या सुमारास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी मित्र परिवारासोबत कुटुंबीयांनी सहकार्य केले, असे श्वेता सांगतात.

advertisement

अपयशातून यशापर्यंत

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर 2017 मध्ये पहिल्यांदा अबकारी विभागात सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. तरीही पुढील परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला. राज्यसेवेतून तीन वेळा पोलीस उपअधीक्षक पदासाठी मुलाखत दिली. परंतु, अफयश आलं. शेवटी 2020 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली, असं श्वेता यांनी सांगितलं. सध्या त्या माजगाव येथे कार्यरत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
कॉम्प्युटर इंजिनिअर ते पोलीस उपअधीक्षक, पाहा श्वेता खाडे यांचा प्रेरणादायी प्रवास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल