TRENDING:

तरुणी प्रियकराला भेटायला निघाली, कुटुंबीयांना संशय आला, पाठलाग केला अन्..., बीडमध्ये खळबळ

Last Updated:

Beed News: प्रियकर हातातून निसटल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी नंतर आपला रोष त्या तरुणीवर काढला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: एक तरुणी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. त्यांनी तिचा पाठलाग केला. या घटनेत प्रियकर निसटून जाण्यात यशस्वी झाला, पण संतापलेल्या नातेवाइकांनी संबंधित तरुणीवर आपला राग काढल्याचे समोर आले आहे. बीडमधील युसूफवडगाव पोलिस ठाणे हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला.
तरुणी प्रियकराला भेटायला निघाली, कुटुंबीयांना संशय आला, पाठलाग केला अन्..., बीडमध्ये खळबळ
तरुणी प्रियकराला भेटायला निघाली, कुटुंबीयांना संशय आला, पाठलाग केला अन्..., बीडमध्ये खळबळ
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील तरुणीला भेटण्यासाठी शेजारच्या लाडेवडगाव येथील तरुण आला होता. दोघे भेटणार असल्याची चाहूल नातेवाइकांना लागल्यानंतर त्यांनी त्या तरुणाचा पाठलाग सुरू केला. मात्र, परिस्थितीची जाणीव होताच तो तरुण घटनास्थळावरून पसार झाला.

“तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहिलाय”, ठाण्यातील अल्पवयीन मुलीला बीडमध्ये आणलं, शेतातल्या घरात...

प्रियकर हातातून निसटल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी नंतर आपला रोष त्या तरुणीवर काढला. त्यांनी शेजारच्या गावात जाऊन संबंधित तरुणीला गाठले. त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीलाही त्यांनी लक्ष्य केले. दोघींनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

दरम्यान, या प्रकाराची माहिती परिसरातील एका नागरिकाने तातडीने पोलिसांना दिली. “दोन मुलींना काही लोक मारहाण करत आहेत,” अशी माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र तपासात हे प्रकरण घरगुती वादाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

महत्त्वाचे म्हणजे, संबंधित कुटुंबाने कोणतीही अधिकृत तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांना पुढील कारवाई करता आली नाही. त्यामुळे या घटनेत गुन्हा दाखल न होता पोलिसांना परतावे लागले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
तरुणी प्रियकराला भेटायला निघाली, कुटुंबीयांना संशय आला, पाठलाग केला अन्..., बीडमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल