'मी मराठी बोलणार नाही' असं म्हणणाऱ्या बस स्थानकातील शौचालय चालकाला मराठीच्या मुद्दयावरुन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला होता. या प्रकरणी आता नांदेडमधील उत्तर भारतीय एकवटले आहे. उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी आणि तरुणांनी पोलीस स्टेशन गाठलं. यावेळी मारहाण झालेला अमरेश झा सुद्धा सोबत होता. विना कारण आपल्याला मारहाण कऱण्यात आल्याचा आरोप शौचालय चालक अमरेश झा याने केला. परवा चार ते पाच जण आले त्यांनी विनाकारण वाद घातला. जेव्हा मी रागात मराठी बोलणार नाही असं म्हणालो, त्यावेळी मुद्दाम त्यांनी व्हिडिओ काढला आणि मला मारहाण केली. शौचालयात लघुशंकेसाठी महिलांकडून पैसै आकारले नसल्याचा दावा अमरेश झा यांनी केला.
advertisement
या घटनेबद्दल उत्तर भारतीयांनी रोष व्यक्त केला. 'मराठीची बळजबरी करता येणारं नाही. भारत हा संविधानवर चालतो. देशभरात कुठेही राहण्याचा अधिकार आहे. भाषेचा मुद्दा उपस्थित करुन राज्यात राजकरण केलं जात आहे. आम्ही २५ वर्षांपासून महाराष्ट्रात राहतो. आता आम्हाला मराठी थोडी थोडी बोलता येते. नांदेडमध्ये हिंदी भाषेत बोलणारे १० लाख लोक आहे. उगाच गरीब उत्तर भारतीयांना मारहाण केली जात आहे. उत्तर भारतीयांना जर दररोज अशी मारहाण होत राहील तर त्यांनाही हाथ उगारावा लागेल, मग तुम्हीच म्हणाल, उत्तर भारतीय उद्रेक करतात, उद्या निवडणुका होतील त्यावेळी आम्हीही दाखवून देऊ, असा इशारा देखील देण्यात आला.
मनसेसैनिकांवर गुन्हे दाखल
दरम्यान, या प्रकरणी उत्तरभारतीय शौचालय चालक अमरेश झा याच्या तक्रारी वरुन वजीराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आज मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी अटक देखील केली. लघुशंखेसाठी महिलांकडून हा शौचालय चालक पाच रुपये आकारत होता. याचा जाब विचारणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांसोबत त्याचा वाद झाला. 'मराठीत बोलणार नाही काय करायचं करा' असं आव्हान अमरेश झा याने दिल्याने त्याला चोप देउन मनसेने माफी मागावी लावली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्या विरोधात कारवाई केली.