TRENDING:

भायखळा विधानसभा निवडणूक 2024: लोकसभेच्या पराभवातून सावरत यामिनी जाधव सावरणार का भायखळ्याचा गड?

Last Updated:

Byculla Assembly Election 2024: आता पुन्हा एकदा भायखळ्यातून विधानसभा त्या लढवत आहेत. त्या शिवसेनेचा गड शिंदेंसाठी राखणार का की महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेना पक्षाचे नेते मनोज जामसुतकर माजी मारणार हा प्रश्न आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दक्षिण मुंबईतील लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे भायखळा. भायखळा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या विद्यमान आमदार आहेत. त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीने तिकिट दिलं होतं. पण उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी त्यांचापराभव केला.
Byculla Assembly Election 2024
Byculla Assembly Election 2024
advertisement

आता पुन्हा एकदा भायखळ्यातून विधानसभा त्या लढवत आहेत. त्या शिवसेनेचा गड शिंदेंसाठी राखणार का की महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेना पक्षाचे नेते मनोज जामसुतकर माजी मारणार हा प्रश्न आहे. त्यात MIM ने ही त्यांचा उमेदवार उतरवल्याने भायखळ्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. AIMIM चे माजी मुंबई शहर प्रमुख फैयाझ अहमद भायखळ्यातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाशी समझोता करून त्यांचं मतविभाजन रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

advertisement

भायखळा विधानसभा मतदारसंघ इतिहास

भायखळा विधानसभा क्षेत्रात 40 टक्क्यांवर मुस्लीम मतदार आहेत. 2009 पर्यंत भायखळा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2014 निवडणुकीत परिस्थिती  बदलली. 2014 ला एआयएमआयएमचे वारिस पठाण या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 2019 ला वारिस पठाण यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा या मतदारसंघात विजय झाला. मुस्लीम मतदार महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकणार की मुस्लीम मतांचं विभाजन होणार यावर मनोज जामसुतकर यांचं यशापयश अवलंबून आहे.

advertisement

कुलाबा विधानसभा निवडणूक 2024: राहुल नार्वेकरांविरोधात काँग्रेसने दिला मारवाडी उमेदवार; कुलाब्यात मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष?

2019 विधानसभा मतदारसंघ परिस्थिती

  • यामिनी जाधव – शिवसेना – 51,180
  • वारिस पठाण – MIM – 31,157
  • अण्णा मधु चव्हाण – काँग्रेस  - 24,139

यामिनी जाधव आणि मनोज जामसुतकर हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन वेळा आमने सामने आले होते. तेव्हा यामिनी जाधवांनी त्यांना नमवलं होतं. जामसुतकर मूळचे काँग्रेसचेच नेते आहेत. ते काँग्रेस नगरसेवकपदासाठी निवडणुकीत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकिट मिळालं नाही तेव्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जामसुतकरांची पत्नी काँग्रेसची माजी नगरसेविका आहे. आता हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकमेकांसमोर आहेत. पण MIM आणि काँग्रेसच्या बंडखोरीचं  आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल.

advertisement

 2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?

भायखळा विधानसभा हा दक्षिण मुंबई लोकसभेअंतर्गत येतो. तिकिट वाटपापासूनच हा मतदारसंघ चर्चेत होता. सेना विरुद्ध सेना अशी थेट लढत तिथे झाली आणि उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आले आणि पुन्हा खासदार झाले. एकनाथ शिंदेंनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना लोकसभेचं तिकिट दिलं होतं. पण अरविंद सावंतांनी त्यांच्यावर मात केली. खुद्द यामिनी जाधवांच्याच भायखळा मतदारसंघात त्यांना चांगली मतं मिळाली नाहीत. तब्बल 46066 मतांनी सावंतांनी भायखळ्यात  आघाडी घेतली होती आणि तीच निर्णायक ठरली. अरविंद सावंत यांना 86883 मतं तर यामिनी जाधव यांना फक्त 40817 मतं या विधानसभा क्षेत्रातून मिळाली. त्या निवडणुकीत मुस्लिमांची एकगठ्ठा मतं महाविकास आघाडीच्या म्हणजे अरविंद सावंतांच्या पारड्यात पडली होती. आता मात्र MIM रिंगणात आहे आणि काँग्रेसच्या एका गटाने उबाठा गटाच्या उमेदवाराला विरोध केला आहे. मुस्लीम उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न झाले. या नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो.

advertisement

दक्षिण मुंबईतील इतर विधानसभा मतदारसंघातील चित्र

  • वरळी विधानसभा – आदित्य ठाकरे – शिवसेना (उबाठा)
  • शिवडी विधानसभा – आमदार अजय चौधरी  - शिवसेना (उबाठा)
  • भायखळा विधानसभा - आमदार यामिनी जाधव  - शिवसेना
  • मलबार हिल विधानसभा – आमदार मंगलप्रभात लोढा - भाजप
  • मुंबादेवी विधानसभा - आमदार अमीन पटेल - काँग्रेस
  • कुलाबा विधानसभा - आमदार राहुल नार्वेकर – भाजप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

वाई विधानसभा निवडणूक 2024 : वाईच्या सुभ्यासाठी दोन राष्ट्रवादींमध्ये काटें की टक्कर! मकरंद पाटलांसमोर अरुणादेवी पिसाळांचं आव्हान

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भायखळा विधानसभा निवडणूक 2024: लोकसभेच्या पराभवातून सावरत यामिनी जाधव सावरणार का भायखळ्याचा गड?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल