अरविंद सावतांचं शायना एनसींबद्दल वादग्रस्त विधान, आदित्य ठाकरेंकडून खेद व्यक्त
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. याप्रकरणी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.
विजय देसाई, प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. याप्रकरणी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. आता आदित्य ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्या या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. अरविंद सावंत कोणा एका व्यक्तीला बोलले नव्हते, ते सगळ्या 12 च्या 12 जणांना बोलले होते, तरी जर कुणाला वाईट वाटलं असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
advertisement
अरविंद सावंत यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना ज्यांनी पक्षात घेतलं, त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. बिल्कीस बानो यांच्या रेपिस्टची आरती ज्यांनी केली, ज्या वामन म्हात्रेने महिला पत्रकाराला विचारलं, अब्दुल सत्तारने सुप्रिया सुळेंना शिव्या दिल्या, ज्या संजय राठोड यांच्यावर गंभीर गुन्हा आहे, त्यावर बोलणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
advertisement
अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले?
view commentsइथं इम्पोर्टेड माल चालत नाही, आमच्याकडे ओरिजनल माल चालतो. ओरिजनल माल अमिन पटेल आहे असं अरविंद सावंत म्हणाले होते. अरविंद सावंत हे अमिन पटेल यांच्या प्रचारावेळी बोलत होते. आता त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला असून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2024 10:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अरविंद सावतांचं शायना एनसींबद्दल वादग्रस्त विधान, आदित्य ठाकरेंकडून खेद व्यक्त


