वाई विधानसभा निवडणूक 2024: वाईच्या सुभ्यासाठी दोन राष्ट्रवादींमध्ये काटें की टक्कर! मकरंद पाटलांसमोर अरुणादेवी पिसाळांचं आव्हान

Last Updated:

Wai Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: युतीच्या जागावाटप सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीकडेच आली आणि अजित पवारांनी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनाच तिकिट दिलं आहे.

Wai Assembly Election 2024
Wai Assembly Election 2024
सातारा : सातारा हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक गड. या जिल्ह्याकडून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षा आहेत. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण हे विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सध्याच्या स्थितीनुसार 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे विद्यमान आमदार आहेत तर 3 विधानसभा महाविकास आघाडीच्या आमदारांकडे आहेत. वाई हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या गटांमध्ये या मतदारसंघात थेट लढत होणार आहे. मकरंद पाटील हे वाईचे विद्यमान आमदार आहेत. ते अजित पवार यांचे समर्थक आहेत. युतीच्या जागावाटप सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीकडेच आली आणि अजित पवारांनी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनाच तिकिट दिलं आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाडे आला आहे. शरद पवारांनी अरुणा पिसाळ यांना तिकिट देऊन चांगला डाव टाकला आहे. आता वाईत राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये सामना होईल. आमदार मकरंद पाटील यांच्यापुढं सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांचं आव्हान असणार आहे.
advertisement
वाई मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. वाई हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
वाईमध्ये गेली अनेक वर्षं काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार आमदार होत आहेत. गेल्या तीन निवडणुका मकरंद जाधव पाटील हेच जिंकले आहेत. 2009 ची निवडणूक मकरंद पाटलांनी अपक्ष म्हणून लढवली आणि ते जिंकले. 2014 आणि 2019 ला त्यांना राष्ट्रवादीने तिकिट दिलं. सलग तीन वेळा जिंकून मकरंद पाटलांनी हॅटट्रिक साधली आहे. पण ते अजित पवार यांचे समर्थक असल्याने या वेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचे पारंपरिक विरोधक आता त्यांच्या सोबत आहेत.
advertisement
वाई विधानसभा मतदारसंघात 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी लढत पाहायला मिळाली होती. मात्र, मदन भोसले भाजपमध्ये आहेत. महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळं मदन भोसले यावेळी रिंगणात नाहीत.शरद पवारांच्या पक्षाकडून अरुणादेवी पिसाळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं आता मतदारसंघात मकरंद पाटील विरुद्ध अरुणादेवी पिसाळ अशी लढत होईल.
advertisement
भायखळा विधानसभा निवडणूक 2024: लोकसभेच्या पराभवातून सावरत यामिनी जाधव सावरणार का भायखळ्याचा गड?
मकरंद पाटील यांच्यासाठी सोपी वाटणार निवडणूक आता आव्हानात्मक झाली आहे. कार अरुणादेवी पिसाळ यांच्यामागेही कार्यकर्त्यांची फौज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार आणि अजित पवारांमध्ये विभागले गेले आहेत. कोणाची ताकद अधिक हे आता निवडणुकीनंतरच कळेल.

2024 लोकसभा निवडणुकीत काय झालं?

advertisement
वाई विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. साताऱ्यात या लोकसभा निवडणुकीच्या वेळी हाय व्होल्टेज उमेदवार होते. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे उदयनराजे भोसले यांच्यात लढत झाली. भाजपचे उदयनराजे यांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा उदयनराजे यांना 5 लाख 71 हजार 134 मते मिळाली. त्यांनी शिंदे यांचा 32771 मतांच्या फरकाने पराभव केला. पण वाई विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी शशिकांत शिंदे आघाडीवर राहिले होते. त्यांना वाईत मताधिक्य होतं. आता या निवडणुकीत वाईची जनता कुठल्या राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकणार हे लवकरच समजेल.
advertisement

सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदार आणि त्यांची भूमिका

1. सातारा जावळी- शिवेंद्रराजे भोसले- भाजप
2. वाई - मकरंद पाटील – राष्ट्रवादी
3. फलटण- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
4. माण खटाव- जयकुमार गोरे- भाजप
5. कोरेगाव- महेश शिंदे- शिवसेना
6. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
7. कराड दक्षिण - पृथ्विराज चव्हाण - कॉंग्रेस
advertisement
8. पाटण - शंभुराजे देसाई – शिवसेना
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाई विधानसभा निवडणूक 2024: वाईच्या सुभ्यासाठी दोन राष्ट्रवादींमध्ये काटें की टक्कर! मकरंद पाटलांसमोर अरुणादेवी पिसाळांचं आव्हान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement