Shubman Gill : गिलला टी-20 वर्ल्ड कप टीममधून का काढलं? कोच गौतम गंभीरची पहिली रिएक्शन, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी शनिवारी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. टी-20 टीमचा उपकर्णधार शुभमन गिल याला डच्चू देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी शनिवारी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. टी-20 टीमचा उपकर्णधार शुभमन गिल याला डच्चू देण्यात आला आहे. टीम मॅनेजमेंटला टॉप ऑर्डरमध्ये विकेट कीपर हवा होता, त्यामुळे इशान किशनची निवड करण्यात आली, असं कारण निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी दिलं. तसंच टॉप ऑर्डरमध्ये विकेट कीपर हवा असल्यामुळे गिल आणि जितेश शर्माला बाहेर करावं लागल्याचं आगरकर म्हणाले. टीम कॉम्बिनेशनसाठी हा निर्णय घेतला गेल्याचं आगरकर म्हणाले.
शुभमन गिलला टीमबाहेर करण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंट म्हणजेच कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीरचा असल्याचं अजित आगरकर अप्रत्यक्षरित्या म्हणाले. यानंतर आता गिलला टीमबाहेर करण्याबाबत प्रशिक्षक गौतम गंभीरला प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर गौतम गंभीरने मौन बाळगलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजनंतर गंभीर दिल्लीतल्या त्याच्या घरी जात होता, तेव्हाच विमानतळावर पत्रकारांनी गंभीरला गिलबद्दल प्रश्न विचारला, पण गंभीर कोणताही प्रतिसाद न देता गाडीमध्ये बसून निघून गेला.
advertisement
गिलला वगळण्याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं मौन बरंच काही सांगून गेलं. गिलने आशिया कप टी-20 स्पर्धेतून टीम इंडियात कमबॅक केलं, यानंतर संजू सॅमसनच्या जागी गिलला ओपनिंगची संधी मिळाली, पण त्याला अपयश आलं. 15 इनिंगमध्ये गिलने 137.26 च्या स्ट्राईक रेटने 291 रन केल्या, यात त्याने एकही अर्धशतक ठोकलं नाही.
#WATCH | Indian Men's Cricket Team Head Coach Gautam Gambhir arrives in Delhi
BCCI today announced India’s squad for the ICC Men’s T20 World Cup 2026. pic.twitter.com/RbqVtaixyR
— ANI (@ANI) December 20, 2025
advertisement
गिलला दुखापत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 मॅचच्या आधी गिलच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे तो सीरिजच्या शेवटच्या सामन्यातही खेळू शकला नाही. गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळाली, यात त्याने 22 बॉलमध्ये 37 रन केले. संजू सॅमसन अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला खेळला, टी-20 वर्ल्ड कपमध्येही हीच जोडी मैदानात दिसेल. गिलला टीमबाहेर केल्यामुळे अक्षर पटेलला पुन्हा एका उपकर्णधार करण्यात आलं आहे.
advertisement
सूर्यकुमार यादवचाही संघर्ष
दुसरीकडे कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्मही चिंतेचा विषय बनला आहे. सूर्यकुमार यादवने यावर्षी 19 टी-20 सामन्यांमध्ये फर्त 218 रन केल्या आहेत, यात त्याचा स्ट्राईक रेट 123.2 चा होता. सूर्यकुमार यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा सगळ्यात वाईट हंगाम होता, पण कर्णधार असल्यामुळे सूर्यकुमार यादव टीममध्ये असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : गिलला टी-20 वर्ल्ड कप टीममधून का काढलं? कोच गौतम गंभीरची पहिली रिएक्शन, Video











