मातोश्री वृद्धाश्रमाला समाजाला आपले काहीतरी देणे आहे या भावनेतून सर्वसामान्य नागरिक देखील काही प्रमाणात देणगी येथे देतात तसेच ज्यांची परिस्थिती चांगली असेल अशा 25 टक्के नागरिकांकडून आकारण्यात आलेली नाममात्र रक्कम यावर वृद्धाश्रमाचा सर्व खर्च भागवला जातो.
येथील महिला पुरुषांचा सांभाळ करताना त्यांना काही सुविधा पुरवल्या जातात त्यामध्ये आठवड्यातील दर गुरुवारी आरोग्य तपासणी करणे, तसेच दर मंगळवारी पुरुषांचे शेव्हिंग कटिंग करून दिले जाते. वृद्धाश्रमात राहणाऱ्या सगळ्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच धार्मिक स्थळे दाखवणे, कौटुंबिक चित्रपट, नाटक दाखवणे अशा पद्धतीने त्यांचे मनोरंजन केले जाते.
advertisement
Micro Art: चक्क पेन्सिलच्या टोकावर साकारले वेगवेगळे शिल्प, आशुतोषचे थक्क करणारे मायक्रो आर्ट, Video
वृद्धाश्रमातील महिला पुरुषांची दिनचर्या सर्वसामान्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. सकाळी साडे सहा वाजता यांना चहा, दूध देण्यात येते, 9 वाजता नाश्ता दिला जातो 10 वाजेच्या दरम्यान सामूहिक प्रार्थना होते. त्यानंतर वृत्तपत्र वाचन. त्यानंतर त्यांना आरामासाठी वेळ दिला जातो.
मातोश्री वृद्धाश्रम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासह विविध राज्यातून वृद्ध येत असतात. तसेच वृद्धाश्रमांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, बऱ्याचदा वृद्ध महिला पुरुष आहेत त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची एकच इच्छा असते की आपल्या मुलाला, मुलीला भेटावे. मात्र काही वेळा त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील ते येत नाहीत ही खूप मोठी शोकांतिका आहे त्यामुळे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत, असे देखील पागोरे यांनी म्हटले आहे.





