बुलढाणा जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले असून तिची आई मजुरी करून मुलीचं शिक्षण चालवत होती. डॉक्टर होण्याचं स्वप्न मनात घेऊन ती ‘नीट’च्या तयारीसाठी 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आली. त्या खासगी ट्युशनमध्ये शिक्षक महेश मखमले (वय 34, रा. बुलढाणा) शिकवत होता.
लग्नात ओळख अन् प्रेम फुललं, पण शेवटी आयुष्यच उद्ध्वस्त झालं; प्रियकरानं दिव्यासोबत असं काय केलं?
advertisement
सुरुवातीला वर्गात संपर्क आलेल्या महेशने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली आणि काही काळातच "मी तुझ्यावर प्रेम करतो, मी माझ्या पत्नीला सोडून तुझ्याशी लग्न करीन" असे मेसेज पाठवू लागला. मुलीने वारंवार नकार दिल्यानंतरही तो तिचा पाठपुरावा करत राहिला. एप्रिल 2025 मध्ये परीक्षेदरम्यान त्याने तिला वर्गाबाहेर नेऊन विनयभंग केला. त्यावेळी अचानक नातेवाईक आल्याने त्याने तिला सोडून दिले.
यानंतर 19 ऑगस्ट रोजी मुलगी भानुदासनगर परिसरात पायी जात असताना आरोपीने रस्त्यात गाठत तिला जबरदस्ती कारमध्ये बसवले. त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. शुद्धीवर आल्यावर ती बीड बायपास परिसरात होती. तिच्या अंगावर चट्टे, वेदना आणि भीतीचा ठसा स्पष्ट होता. अत्याचारानंतर आरोपीने तिला धमकावत गुजरातला येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्यावर त्याने तिला कारमधून उतरवले.
या घटनेनंतर मुलगी मानसिक धक्क्यात गेली. शिक्षकाच्याच अत्याचाराची तक्रार करण्याची तिची हिंमत झाली नाही. नैराश्यातून तिने हॉस्टेलमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या मैत्रिणीमुळे तिचे प्राण वाचले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
कुटुंबाच्या तक्रारीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात शिक्षक महेश विजय मखमले आणि त्याचा कारचालक सिद्धेश्वर जायभाये यांच्यावर पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर आणि निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी दोघांना अटक केली आहे.






