छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवीदास थोरात हा तरुण देखील गेल्या अनेक वर्षांपासून मुक्या प्राण्यांसाठी काम करत आहेत. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्गमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. नाचनवेल येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास विद्युत तारेच्या धक्क्याने एक माकड मृत्युमुखी पडले. रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी नेहमीप्रमाणे निसर्गमित्र देवीदास थोरात यांना फोनवरून याबाबत माहिती दिली.
advertisement
Snake News: पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या, शिर्डीत आढळला अत्यंत दुर्मिळ साप, तुम्ही पाहिलाये का?
माकड मेल्याची माहिती मिळताच देवीदास हे हातातील कामे सोडून तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या माकडाला अंजना नदीपात्रात घेऊन गेले. वन विभागाला देखील सविस्तर माहिती दिली आणि या मृत माकडावर अंत्यसंस्कार केले. एखाद्या माणसाप्रमाणे माकडाचा दफनविधी झाला.
दरम्यान, परिसरात कुठेही माकडाचा मृत्यू झाल्यास देवीदास हे त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. अपघातात जखमी असल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करतात. “गेल्या अनेक वर्षांपासून मी हे काम करत आहे. आपण देखील समाजासाठी काहीतरी देणे लागतो म्हणून हे काम करणे गरजेचे आहे,” असे देवीदास थोरात सांगतात.





