भारतीय पुरातत्त्व विभागाने यासंदर्भात डिसेंबर 2025 पासून एक नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार, किल्ल्यावर प्लास्टिकची बाटली घेऊन जाणाऱ्या पर्यटकांनी दर बाटलीमागे 20 रुपये जमा करावे लागणार आहेत. जर त्यांनी ती बाटली परतीच्या वेळी पुन्हा आणली, तर ही रक्कम त्यांना परत दिली जाईल.
Siddharth udyan : पर्यटकांसाठी पर्वणी, सिद्धार्थ उद्यानात आले नवे पाहुणे, पाहा खास PHOTOS
advertisement
प्लास्टिक कचऱ्यामुळे खंदकात खच वाढतोय
टूरिस्ट गाइड असोसिएशनचे अध्यक्ष भारत जोशी यांनी सांगितले की, पावसाच्या पाण्यामुळे फेकलेल्या बाटल्या थेट किल्ल्याच्या खंदकात जमा होतात. त्यामुळे खंदकात प्लास्टिकचा ढिग साचतोय, जो किल्ल्याच्या नैसर्गिक रचनेवर आणि सौंदर्यावर परिणाम करत आहे.
सजगतेने पर्यटकांनी सहभाग घ्यावा
सहायक संरक्षण अधिकारी संजय रोहणकर यांनी सांगितले की, या नव्या नियमामुळे प्लास्टिकच्या बाटल्या किल्ल्यावर इतरत्र फेकून देण्याचे प्रमाण कमी होईल. पर्यटकांनी जबाबदारीने वागून स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हा निर्णय पर्यावरण रक्षण आणि किल्ल्याचे जतन या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.