छत्रपती संभाजीनगर : अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे शिकत असताना नवनवीन ॲप हे तयार करतात. हे ॲप समाजासाठी खूपच उपयोगाचे ठरतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील चार विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे गुगलतर्फे विद्यार्थ्यांच्या या ॲपसाठी तब्बल 10 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यांच्या या ॲपने जगामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामधील चार विद्यार्थ्यांनी मिळून एक ॲप तयार केलं. कृष्णा आवटे, शुभम पिटेकर, मोहम्मद रिहान आणि सारिका चव्हाण अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांनी स्पून शेअर नावाचे ॲप तयार केलं आहे. या ॲपला गुगलतर्फे 10 लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ॲपला जगात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
advertisement
काय आहे स्पून शेअर ॲप -
स्पून शेअर ॲप हे एक असे ॲप आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवू शकता. आपल्याकडे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. पण काही लोक असे आहेत, ज्यांना एक वेळचं जेवणही भेटत नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी हे ॲप तयार करायचं ठरवलं आणि स्पून शेअर नावाने हे ॲप तयार केलं.
जर तुमच्याकडे अन्न असेल आणि जर ते वाया जाणार असेल तर या ॲपवर तुम्ही सामाजिक संस्थांशी संपर्क करून त्यांना हे अन्न देऊ शकता. तसेच हे लोक गरजू लोकांपर्यंत जाऊन अन्न पोहोचवण्याचं काम करतात. यामुळे अन्नाची नासाडी तर होतच नाही. पण गरजू लोकांना जेवणही मिळते. जे अन्न खराब होणार आहे, त्या अन्नापासून खतनिर्मिती होते. त्यामुळे हे उरलेला अन्न खत निर्मितीसाठी देखील देण्यात येते.
पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती
विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या या भावना -
आम्हाला जेव्हा कळलं की गुगल ही स्पर्धा घेणार आहे. तेव्हा आम्ही या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं आणि त्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून भाग घेतला. या स्पर्धेच्या तीन फेऱ्या झाल्या होत्या त्यामध्ये पहिले 100 टीम सहभागी झाल्या होत्या. विविध देशांमधल्या टीमने यामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसरी फेरी झाली. त्यामध्ये 100 पैकी फक्त 10 टीमची निवड करण्यात आली. यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये तीन ॲपची निवड करण्यात आली.
यामध्ये गुगलने आमचीही निवड केली. 29 जून रोजी या स्पर्धेचा निकाल लागला आणि आम्हाला कळलं की आमचा जगामध्ये तिसरा क्रमांक आला आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती आणि आम्हाला 10 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहेत, या शब्दात या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना लोकल18 शी बोलताना व्यक्त केल्या.
समाजाला याचा उपयोग होईल -
आमच्या विद्यार्थ्यांनी हे जे ॲप तयार केले आहे, ते समाजाच्या उपयोगाचे आहे. त्याचा नक्कीच अनेक लोकांना उपयोग होईल. पण यासोबतच आमच्या महाविद्यालयासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी त्या विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुभाष लहाने यांनी दिली.