TRENDING:

काय हा प्रकार? दसऱ्याला रावणाचं नाहीतर शूर्पणखेचं होतं दहन, ठिकाण माहितीये का?

Last Updated:

दसऱ्याला देशभरात रावण दहनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण महाराष्ट्रातील एका ठिकाणी रावणाचं दहन न करता रावणाची बहीण शूर्पणखा दहन केलं जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे. देशभरात विविध ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी एक संस्था आहे जी रावणाचं दहन न करता रावणाची बहीण शूर्पणखा दहन करते. नेमकं हे दहन का केलं जातं? याबाबत जाणून घेऊ.

advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरात पत्नीपीडित आश्रम ही संघटना आहे. दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन न करता ते रावणाची बहीण शूर्पणखा हिचं दहन करतात. "रावणामध्ये पुरुषी अहंकार होता तो आता पूर्णपणे संपला आहे. मात्र ज्या महिला आहेत त्यांच्यामधला अहंकार त्यांचे पुरुषांवरती अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. बिचाऱ्या पतीला पत्नी या मुद्दाम त्रास देत आहेत. याकरिता ही पत्नीपीडित संघटना रावणाचं दहन न करता शूर्पणखाचे दहन करते, असं संघटनेचे सदस्य सांगतात.

advertisement

अमरावतीमध्ये संपन्न होतो खापरी उत्सव, नेमकी काय आहे ही परंपरा, कसा साजरा होतो हा सण?

का होतं शूर्पणखा दहन?

"शूर्पणखा ही वाईट प्रवर्तीची होती. त्याचप्रमाणे आता ज्या पत्नी आहेत त्या देखील तशाच बनत चाललेल्या आहेत. ज्या पत्नी आपल्या पतीवरती अत्याचार करतात. त्यांना त्रास देतात. मानसिक त्रास देतात तर त्यांच्या मधली ही वाईट प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि आमच्यासारख्या बिचाऱ्या पतीला अशा शूर्पणखे सारख्या पत्नीने त्रास देऊ नये. म्हणून आम्ही रावणाचे दहन न करता शूर्पणखाचे दहन करतो," असं या संस्थेचे अध्यक्ष अॅड भारत फुलारे यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
काय हा प्रकार? दसऱ्याला रावणाचं नाहीतर शूर्पणखेचं होतं दहन, ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल