बेरल सांचीस यांची श्वानांशी मैत्री
छत्रपती संभाजीनगरमधील बेरल सांचीस यांना लहानपणापासून श्वानांची आवड आहे. त्यामुळे रस्त्यावर भटकणाऱ्या श्वानांसाठी त्यांनी काम करण्याचं ठरवलं. शहरातील विविध ठिकाणी फिरणाऱ्या श्वानांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्याची काळजी घेण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यामुळे त्याचं या श्वानांशी एक घट्ट नातं तयार झालं आहे. रस्त्यावरील प्रत्येक श्वान त्यांना ओळखतो. अगदी त्यांच्या गाडीचा हॉर्न ऐकला तरी श्वान गोळा होतात.
advertisement
फ्रेंडशिप डे निमित्त बाजारपेठे सजली, पाहा यंदा काय आहे ट्रेण्ड?
श्वानांच्या आरोग्याची घेतात काळजी
बेरल या शहरातील भटक्या श्वानांच्या आरोग्याची काळजी घेतात. एखादा श्वान आजारी असल्यास त्याला दवाखान्यापर्यंत घेऊन जातात. त्यांना औषधोपचार करतात. तसेच गरज असेल तेव्हा व्हॅक्सिनेशन, स्वच्छता करणे हे देखील आवडीने करतातत. तसेच उपचारांसोबत खाण्यापिण्याची काळजीही घेतात. त्यामुळे त्यांचं हे श्वानप्रेम शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
टेंशन फ्री होण्याचा उपाय
माझ्यासाठी श्वानांवर प्रेम करणं म्हणजे एक ट्रेस रिलीज थेरेपी आहे. मी जेव्हा ऑफिस वरून काम करून थकून येते. तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर त्यांना जवळ घेतल्यानंतर माझा संपूर्ण कामाचा थकवा निघून जातो. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने श्वानांशी छान मैत्री करावी. त्यांना विनाकारण मारू नये किंवा उगाच त्यांना त्रास देऊ नये. मुख्या प्राण्यांवर सर्वांनी प्रेम करावं, त्यामुळे ते देखील तुमच्यावर प्रेम करतील, असं श्वान प्रेमी बेरल सांचीस सांगतात.