छत्रपती संभाजीनगर : उद्या आषाढी एकादशी आहे. यासाठी बहुतांश जण अगदी मनापासून आणि भक्ती भावाने विठ्ठल रुख्मिणी मातेच्या दर्शनासाठी जातो. पण प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातही एक लहान पंढरपूर आहे. याठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. लहान पंढरपूर या ठिकाणी असलेले विठुरायाचे मंदिर हे संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावर आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण शहरातून तसेच आजूबाजूच्या परिसरातूनही भाविक येतात.
advertisement
वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. या ठिकाणी जिल्हाभरातून जवळपास 150 ते 200 लहान मोठा दिंड्या येत असतात. आषाढी एकादशीनिमित्त यात्राही भरते. एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात. यावर्षीही भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने एकादशीनिमित्त वाळूज, पंढरपूरकडे जाणाऱ्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यावेळी मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत.
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी! आषाढी एकादशीचा उपवास का केला जातो, ही आहे यामागची कहाणी
हे बंद मार्ग -
एएस क्लब चौक ते कामगार चौकापर्यंतचा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. ओएसिस चौक ते आंबेडकर चौक रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. या महामार्गावरील नगर नाका ते एएस क्लब चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.
हे आहेत पर्यायी मार्ग -
- जालना, बीडकडून अहमदनगर, पुण्याकडे जाणारी अवजड वाहने ही महानुभव आश्रम चौक, लिंक रोड टी-राष्ट्रीय महामार्ग (नवीन सोलापूर-धुळे हायवे) मार्गे साजापूर फाटा, एनआरबी चौक, एफडीसी कॉर्नर, कामगार चौकमार्गे जातील.
- जालना, बीडकडून अहमदनगर, पुण्याकडे जाणारी हलकी वाहने ही नगर नाका, मिटमिटा, तीसगाव चौफुली, बडगाव कोल्हाटी, सारा सार्थक, शनी मंदिर, कार्तिक हॉटेल, रांजणगाव फाटा, एफडीसी कॉर्नर, कामगार चौकमार्गे जातील.
कल्याणच्या नॅचरोपॅथीची सर्वत्र चर्चा, गुडघेदुखीसह अनेक आजारांवर प्रभावी, हे आहे लोकेशन
- जालना, बीड, जळगावकडून धुळे, नाशिककडे जाणारी वाहने लिंक रोड किंवा वाल्मी नाका, राष्ट्रीय महामार्ग (नवीन सोलापूर-धुळे हायवे) या मार्गाने जातील व येतील.
- छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने ही नगर नाका, मिटमिटा, तीसगाव चौफुली, वडगाव कोल्हाटी, महाराणा प्रताप चौक, एफडीसी कॉर्नर, कामगार चौकमार्गे जातील किंवा साजापूर गावातून एनआरबी चौक रांजणगाव-एफडीसी कॉर्नर-कामगार चौकमार्गे पुढे जातील.
- पुणे, अहमदनगरकडून जालना-बीडकडे जाणारी अवजड वाहने ही इसारवाडी, बिडकीनमार्गे पुढे जातील व येतील.
- पुणे, अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगर शहरात येणारी हलकी वाहने ही पाटोदा टी, संताजी चौकी, वाल्मी नाका, महानुभव चौकमार्गे पुढे जातील.
- पुणे अहमदनगरकडून धुळे-नाशिककडे जाणारी हलकी वाहने ही पाटोदा टी, संताजी चौकी, वाल्मी नाकामार्गे राष्ट्रीय महामार्ग (नवीन सोलापूर-धुळे हायवे) मार्गे पुढे जातील. उद्या हे पर्यायी मार्ग सुरू असतील.






