पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी! आषाढी एकादशीचा उपवास का केला जातो, ही आहे यामागची कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल एक तसेच कृष्ण पक्षात एक याप्रमाणे वर्षभरात 24 एकादशी येतात. मात्र, यामध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला प्रचंड महत्त्व देण्यात आले आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचा उपवास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे बहुतांश जण आषाढी एकादशीचा उपवास करतात. यादिवशी प्रत्येक घरी उपवासाचे पदार्थ तयार केले जातात. पण आषाढी एकादशीला उपवास का केला जातो, याविषयीची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष राजेश जोशी यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 'प्रत्येक महिन्याच्या शुक्ल एक तसेच कृष्ण पक्षात एक याप्रमाणे वर्षभरात 24 एकादशी येतात. मात्र, यामध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला प्रचंड महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी लोकं पांडुरंगाची मनोभावे सेवा करतात. तसेच या दिवशी उपवासही केला जातो. एकादशीला उपवास करण्यामागे एक मोठी आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
काय आहे आख्यायिका?
आषाढी एकादशी विषयीची कथा सांगताना जोतिष राजेश जोशी सांगतात की, म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्यांच्याकडून वर मिळवला. त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फक्त एका स्त्रीच्या हातून त्याचा मृत्यू होईल, असा वर त्याने मिळवला. म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला.
advertisement
Khadakwasla Dam : खडकवासला धरणाबाबत मोठी अपडेट, जलसंपदा विभागाने व्यक्त केला हा अंदाज
या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला. पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा, विष्णू, महेश आणि सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसांनी ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले.
advertisement
यानंतर देवांनी या देवीची स्तुती केली. यावेळी तिने सांगितले की, माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. अशापद्धतीने विठोबाची मूर्ती आसानावर विराजित करुन त्यांची विधीपूर्वक पूजा करावी. पंचामृताने स्नान घालावं. नंतर देवाची धूप, उदबत्ती, दीप, पुष्प इतर सामुग्रीने पूजा करावी तसेच आषाढी एकादशीचा उपवास करावा, असं सांगितलं जातं.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 15, 2024 5:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी! आषाढी एकादशीचा उपवास का केला जातो, ही आहे यामागची कहाणी