Khadakwasla Dam : खडकवासला धरणाबाबत मोठी अपडेट, जलसंपदा विभागाने व्यक्त केला हा अंदाज
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन 3.50 टीएमसी झाला होता.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासांत 1.45 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुण्याला महिनाभर पुरेल एवढे आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 10.12 टीएमसी झाला आहे.
advertisement
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन 3.50 टीएमसी झाला होता. विशेष म्हणजे 2 जुलै रोजी खडकवासला धरण प्रकल्पात 4.55 टीएमसी पाणीसाठा होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी येऊ लागल्याने जलसाठ्यात वाढ झाली.
advertisement
सिंहगड परिसर मुठा खोऱ्यातही संततधार सुरू आहे. त्यामुळे आंबी, मोसे, मुठा नद्यांसह ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास खडकवासला धरण 2 दिवसांतच भरून वाहील, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
चारही धरणातील वाढलेला पाणीसाठा -
खडकवासला धरणात आजचा पाऊस 11 मि.मी, उपलब्ध साठा 1.19 टीएमसी
पानशेत धरणात आजचा पाऊस 18 मि.मी, उपलब्ध साठा 4.43 टीएमसी
वरसगाव धरणात आजचा पाऊस 18 मि.मी, उपलब्ध साठा 3.58 टीएमसी
टेमघर धरणात आजचा पाऊस 35 मि.मी, उपलब्ध साठा 0.91 टीएमसी
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 15, 2024 1:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Khadakwasla Dam : खडकवासला धरणाबाबत मोठी अपडेट, जलसंपदा विभागाने व्यक्त केला हा अंदाज