कित्येक वर्षांनी घडली पंजांची भेट, कोल्हापुरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन, नेमकं काय घडलं?

Last Updated:

पारंपरिक ढोलताशांच्या तालावर थिरकणारी तरुणाई, नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स, उदाचा दरवळ, त्यातच धो-धो कोसळणाऱ्या पावसात शहरात मोहरमच्या सातव्या दिवशी अनेक पंजांचा भेटीचा सोहळा पार पडला.

+
पंजा

पंजा भेट कोल्हापूर

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : मोहरम निमित्त कोल्हापुरात अनेक ठिकाणी ताबूत बसवण्यात आले आहेत. त्यात मोहरमच्या सातव्या दिवशी शहरातील अनेक पंजे भेटीला बाहेर पडले होते. तर शहरातील काही महत्त्वाचे पंजे कित्येक वर्षांनी भेटीसाठी बाहेर पडल्याने भर पावसात उत्साही मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुका पाहण्यासाठी पावसात देखील भाविकांनी गर्दी केली होती.
पारंपरिक ढोलताशांच्या तालावर थिरकणारी तरुणाई, नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स, उदाचा दरवळ, त्यातच धो-धो कोसळणाऱ्या पावसात शहरात मोहरमच्या सातव्या दिवशी अनेक पंजांचा भेटीचा सोहळा पार पडला. यामध्ये वर्षानुवर्षांची परंपरा असलेले काही पंजे भेटीसाठी यंदा बाहेर पडले होते. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाचे पंजे तब्बल 23 वर्षांनी, तर नंगीवली तालीम मंडळाचा पंजा 15 वर्षांनी भेटीला बाहेर पडले होते. बाबूजमाल तालीम मंडळाचा नाल्याहैदर पंजा देखील भेटीला बाहेर पडला होता. तर शहराच्या मुख्य मार्गांवरुन निघालेल्या या मिरवणुका पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची पावसातही गर्दी पाहायला मिळाली होती.
advertisement
23 वर्षांनी खंडोबा तालमीचा पंजा भेटीला -
शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम या ठिकाणी बसवला जाणाऱ्या पीराला कित्येक वर्षांचा इतिहास आहे. खंडोबा तालमीला 111 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यात या तालमीत बसवला जाणारे जमाल साहेब, हुसेनसाहेब हे पंजे तब्बल 23 वर्षांनी इतर पंजांच्या भेटीसाठी बाहेर पडले होते. यावेळी पी-ढबाक, हलगी, लेझीम, बँड पथक अशा पारंपरिक वाद्यांसह घोडे, आकर्षक लाईट इफेक्ट्स अशी पंजा मिरवणुक काढण्यात आली. परंपरेप्रमाणे पंजाने बाबूजमाल दर्गा, बाराईमाम दर्गा, वाळव्याची स्वारी, घुडणपीर दर्गा, नंगीवली दर्गा या ठिकाणच्या पंजांना भेटी दिल्याचे जाणकार बाळासाहेब चांदसाहेब शिकलगार यांनी सांगितले.
advertisement
सामाजिक एकतेची नंगीवली तालीम पंजाची मिरवणूक -
खंडोबा तालमीप्रमाणेच कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील नंगीवली तालीम मंडळाचा हजरतपीर नंगीवली बाबा पंजादेखील 15 वर्षांनी भेटीस बाहेर पडला होता. या पंजाची मिरवणूक ही सामाजिक ऐक्याची मिरवणूक ठरली. मिरवणुकीत सुरुवातीला प्रबोधनात्मक फलक लावलेल्या रिक्षा, ढोल ताशे पी-ढबाक, हलगी अशा पारंपारिक वाद्यांचा गजर, पाचगाव येथील मुलामुलींचे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवणारे कलापथक, घोड्यांवर स्वार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या वेशभूषेत बालचमू, आतषबाजी असा सर्व लवाजमा पाहायला मिळाला.
advertisement
दरम्यान, मोहरमच्या निमित्ताने नेहमीच कोल्हापुरात हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे ऋणानुबंध घट्ट होत असल्याचे पाहायला मिळत असते. कोल्हापूरातील सर्वधर्मीय भाविक पंजाच्या दर्शनाला न चुकता जात येतात. पंजाला भरजरी पटके अर्पण करुन नतमस्तक होत असतात. अशाप्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे चित्र प्रत्येक पंजा भेटीच्या मिरवणुकीत पाहायला मिळाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कित्येक वर्षांनी घडली पंजांची भेट, कोल्हापुरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement