दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणात 16 हजार 296 क्युसेकने पाण्यात वाढ होत असल्याने धरणातील पाणीसाठा 50.57 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतरच्या 24 तासांत म्हणजेच, सोमवारी संध्याकाळपर्यंत धरणात 46 हजार 647 क्युसेक पाण्याची विक्रमी आवक झाली असून, पाणी पातळी 55.37 टक्क्यांवर पोहोचली आहे.
Monsoon Health Tips : पावसाळ्यात कोणत्यावेळी दही खाणं योग्य? तज्ज्ञांकडून ऐका योग्य पद्धत आणि वेळ
advertisement
जायकवाडी धरणात पाण्याची विक्रमी आवक
जायकवाडी धरणातील या वाढत्या पाणी पातळीमुळे जायकवाडी पाटबंधारे विभाग पूर्णपणे अलर्ट झाला असून, कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी तातडीने पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात धरण उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, यांच्यासह अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर पूर नियंत्रणाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असून, परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जायकवाडी धरण प्रशासन पूर्णपणे अलर्ट असून, धरणाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.






