TRENDING:

माणुसकी सेवालय! बेवारसांना अन् निराधारांना देते आधार, पंडित दाम्पत्य घेते विशेष काळजी, Video

Last Updated:

या दाम्पत्याने माणुसकी सेवालय या उपक्रमातून गरजू, निराधार, मनोरुग्ण, वृद्ध महिला-पुरुषांचा सांभाळ करत त्यांची विशेष काळजी घेण्याचे काम ते करत आहे. स्वयंपाक बनवणे, सेवालालयातील महिला-पुरुषांना अंघोळ घालवणे यासारखी अनेक कामे पंडित दाम्पत्य करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : समाजात बेवारसांना जेव्हा मदत केली, त्यांचा सांभाळ केला जातो अशा वेळी माणुसकी जिवंत राहते, अशीच एक गोष्ट आहे, छत्रपती संभाजीनगरातील पूजा आणि सुमित पंडित यांची आहे. या दाम्पत्याने माणुसकी सेवालय या उपक्रमातून गरजू, निराधार, मनोरुग्ण, वृद्ध महिला-पुरुषांचा सांभाळ करत त्यांची विशेष काळजी घेण्याचे काम ते करत आहे. स्वयंपाक बनवणे, सेवालालयातील महिला-पुरुषांना अंघोळ घालवणे यासारखी अनेक कामे पंडित दाम्पत्य करते. सर्व गरजूंची विशेष काळजी या ठिकाणी घेतली जाते.
advertisement

छत्रपती संभाजीनगर येथे सुमित पंडित हे सलून व्यवसाय करतातव्यवसाय करत असताना त्यांच्या दुकानासमोरून अनेक बेवारस नागरिक जायचेत्यांची दाढी कटिंग करूनअंघोळ घालूनकपडे देण्याचे काम पंडित करत असततसेच त्यांना राहण्यासाठी छत मिळावे म्हणून पंडित वृद्धाश्रमांशी, जिल्ह्यातील आश्रमांशी संवाद साधतमात्र जागा पूर्ण असल्याचे सांगण्यात येत होतेतर काही ठिकाणी कुठला हॉल पाहिजेएसी रूमसारखे त्यासाठी 5 ते 10 हजार रुपये लागत असल्याचे सांगण्यात येत असेत्यामुळे काही काळानंतर माणुसकी सेवालय ही संस्था 2021 साली त्यांनी सुरू केली आणि या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचेत्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंडित यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले

advertisement

Ashadhi Wari 2025: जालना ते पंढरी सायकल वारी, 5000 वारकऱ्यांचं खास रिंगण, पाहा Video

दाम्पत्याने 33 जणांना कुटुंबासोबत जोडले  

माणुसकी सेवालय हे फक्त आश्रयस्थान नसून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि आपुलकी दिली जाते. शहरात तसेच विविध ठिकाणी भटकत असलेल्या लोकांना पोलीस प्रशासनाचे कर्मचारी माणुसकी सेवालयात आणतातत्यानंतर सर्वप्रथम या लोकांच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते. मग जेवण्याचीराहण्याची व्यवस्था करण्यात येते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 1 लाख 25 हजार दिवे, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळले दगडूशेठ गणपती मंदिर
सर्व पहा

माणुसकी सेवालय गरजूंना केवळ तात्पुरता आधार देत नाही तर त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत जोडण्याचं काम देखील करते. आतापर्यंत 33 महिला आणि पुरुषांना त्यांच्या घरी सुखरूपपणे पंडित दाम्पत्याने सोडले आहेसध्या त्यांच्याकडे दोन महिला-पुरुष असून त्यांचा सांभाळ ते करत आहेत, या कामातून समाधान आणि आनंद मिळत असल्याचे पूजा पंडित सांगतात

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
माणुसकी सेवालय! बेवारसांना अन् निराधारांना देते आधार, पंडित दाम्पत्य घेते विशेष काळजी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल