कोणत्या राखींचा ट्रेंड?
औरंगपुरा भागातील स्टॉलवर अनेक ट्रेंडी राख्या पाहायला मिळतात. इथे स्टोन मधील राखी, कार्टून कॅरेक्टर असलेल्या राखी उपलब्ध आहेत. कार्टूनमध्येही छोटा भीम, डोरेमॉन, पोकेमोन, मिकी माऊस, बार्बी डॉल अशा वेगवेगळ्या किड्स राख्या उपलब्ध आहेत. या किड्स राख्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्याचबरोबर कुंदन असलेल्या राख्या, देवी देवतांचे फोटो किंवा छोट्या छोट्या इमेज असलेल्या राख्या, रूद्राक्ष असलेल्या राख्या या ठिकाणी दिसत आहेत. भैया भाई, लुंबा राखी या राख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक खरेदी करतात.
advertisement
हॅण्डमेड राखींना मागणी
विविध प्रकारच्या राखींनी बाजार गजबजलेला आहे. सर्वच राख्यांना मागणी आहे. मात्र, लोकांना हॅण्डमेड राखींचं विशेष आकर्षण असल्याचं दिसतंय. त्यामुळे सर्वाधिक मागणी हॅण्डमेड राखींना आहेत. तसेच देव राखी आणि कार्टूनच्या राखींनाही मागणी आहे, असे राखी विक्रेत्या दिपमाला कांबळे सांगतात.
काय आहेत राखींचे दर?
राखींचे दर हे प्रत्येक राखीच्या प्रकारानुसार भिन्न आहेत. औरंगपुरा येथील मार्केटमध्ये होलसेल दरात राखी मिळतात. अगदी 60 रुपये डझनपासून ते 500 रुपये डझनपर्यंत राखी उपलब्ध आहेत. कार्टून राखी 40 रुपयांपासून ते 200 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. तर हॅण्डमेड राखी सुद्धा 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत असल्याचे दुकानदार सांगतात.
रक्षाबंधनला बहिणीला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट्स, नात्यात येऊ शकतो दुरावा
लोकप्रिय राखी कोणती?
आमच्याकडे बहिणी राखी खरेदी करण्यासाठी येतात. त्या मला विचारतात की सगळ्यात जास्त चालणारी राखी कोणती? सगळ्यात चांगली राखी कोणती? ती आम्हाला दाखवा. आमच्या सल्ल्यानेच त्या त्यांच्या भावासाठी छान छान राख्या खरेदी करतात, असे राखी विक्रेते प्रशांत जाधव सांगतात.





