Raksha Bandhan : रक्षाबंधनला बहिणीला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट्स, नात्यात येऊ शकतो दुरावा
- Published by:Pooja Pawar
- local18
Last Updated:
रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला काही गिफ्ट द्यायचे असेल तर गिफ्ट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या, 28 ऑगस्ट : रक्षाबंधनाचा सण हा भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. यादिवशी बहीण भावाकडून आत्मरक्षाचे वचन घेते. रक्षाबंधनासाठी जिथे बहिणी आपल्या भावासाठी सुंदर राखी खरेदी करण्याच्या गडबडीत असतात तिथे भाऊ देखील बहिणींना ओवाळणीत कोणती भेटवस्तू द्यावी याच्या विचारात असतो.
परंतु रक्षाबंधनाला बहिणींना भेटवस्तू देण्यापूर्वी भावांनी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला काही गिफ्ट द्यायचे असेल तर गिफ्ट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
advertisement
रक्षाबंधनला बहिणींना 'या' वस्तू भेट देऊ नका:
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बहिणींना कपडे किंवा दागिने गिफ्ट देणे खूप शुभ मानले जाते, परंतु त्यांना काळे कपडे भेट देऊ नका. असे केल्यास भावा बहिणीच्या नात्यात तणाव वाढू शकतो, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी हे करणे टाळा.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला जर चपला भेट देणार असाल तर अशी चूक करू नका. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शूज, चप्पल किंवा भेट देणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने नात्यात कटुता निर्माण होऊ शकते.
advertisement
रक्षाबंधनाच्या दिवशी फोटो फ्रेम, घड्याळ, रुमाल, मिक्सर-ग्राइंडर या गोष्टी भेट देणे टाळावे. यामुळे देखील नात्यात दुरावा निर्माण होतो.
या वस्तू द्या भेट :
रक्षाबंधनाच्या शुभ दिनी तुम्ही बहिणींना कपडे, दागिने, पुस्तक, डायरी, मोबाईल किंवा लॅपटॉप इत्यादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता. धार्मिक मान्यतेनुसार बहीण हा बुध ग्रहाचा कारक मानली जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी अशा भेटवस्तू दिल्यास बुध ग्रहालाही बळ मिळते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Uttar Pradesh
First Published :
Aug 28, 2023 8:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Raksha Bandhan : रक्षाबंधनला बहिणीला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट्स, नात्यात येऊ शकतो दुरावा







