TRENDING:

अलका याज्ञिक सारखा आजार होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी?, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती..

Last Updated:

लोकल18 शी बोलतान त्यांनी सांगितले की, अलका याज्ञिक यांना रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस’ हा कानाचा आजार झालेला आहे. यामुळे अचानक ऐकू येणे बंद होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर : सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना एक आजार झालेला आहे, ज्यामळे त्यांना अचानक दोन्ही कानाने ऐकू येणं बंद झालेलं आहे. 'रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस’ असे या आजाराचे नाव आहे. या आजारामुळे अचानकपणे दोन्ही कानातून ऐकणे बंद होते. तर हा आजार आपल्याला होऊ नये, यासाठी आपण काय काळजी घ्यावी काय उपाययोजना कराव्यात याविषयी ज्येष्ठ कानतज्ञ डॉक्टर रमेश रोहीवाल यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे.

advertisement

लोकल18 शी बोलतान त्यांनी सांगितले की, अलका याज्ञिक यांना रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस’ हा कानाचा आजार झालेला आहे. यामुळे अचानक ऐकू येणे बंद होते. हा आजार अचानक पद्धतीने होत नाही, असं डॉक्टरांचे म्हणणं आहे. सर्वप्रथम तर आपण आपल्या कानाची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत हेडफोन लावून गाणे ऐकू नये.

advertisement

वडिलांचं निधन, आई खचली, डोक्यावर 11 लाखांचं कर्ज, पण तरुणीने करुन दाखवलं! कोल्हापूरच्या तरुणीच्या जिद्दीची गोष्ट!

हेडफोन लावले तरी तुम्ही थोड्या थोड्या वेळाने अंतरावर तुम्ही हेडफोन लावावे. 60 टक्के हेडफोन चा आवाज असावा आणि 59 मिनिटे हेडफोन कंटिन्यू लावावे. त्यानंतर थोडा गॅप घेऊन तुम्ही परत हेडफोन अशाच पद्धतीने लावावे. तुम्हाला कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही.

advertisement

नियमितपणे आपल्या कानाची तपासणी ही करायलाच हवी. तुम्हाला जर सर्दी वगैरे झाले तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन संपर्क करावा. कारण, साध्या सर्दीनेसुद्धा हा आजार होण्याचे प्रमाण मोठे आहे. मोठ्या आवाजात जाणे टाळावे जास्त मोठ्याने गाणे ऐकू नये. त्याच पद्धतीने जर तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुम्ही कोणतीही घरगुती उपाय करू नयेत किंवा कानामध्ये कोणताही ड्रॉप किंवा काही एक टाकू नये. सरळ डॉक्टरांकडे जावं आणि यावरती इलाज घ्यावा.

advertisement

जाहिरात क्षेत्रातील मोठी नोकरी सोडली अन् घेतला वडापाव विकण्याचा निर्णय, कल्याणच्या तरुणाची अनोखी गोष्ट!

त्यासोबतच कोणतही धूम्रपान सेवन करू नये. बीपी, शुगर असेल तरी पण डॉक्टरांशी सल्ला घेऊनच गोळ्या औषधे घ्यावे, अशांनी सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घेतली तर तुम्हाला हा आजार होणार नाही आणि तुमचा कान नीट राहील, असेही ते म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अलका याज्ञिक सारखा आजार होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी?, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल