TRENDING:

Yogesh Kadam : मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचीट मिळताच योगेश कदमांचं ट्वीट,थेट विरोधकांना सुनावलं, 'छोटी मोठी वादळं उठली म्हणून...'

Last Updated:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत योगेश कदम यांना क्लिनचीट दिली होती.या क्लिनचीटनंतर आता योगेश कदम यांनी ट्विट केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Yogesh Kadam News : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर चौफेर टीका होत होती. तसेच विरोधकांनी त्याच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत योगेश कदम यांना क्लिनचीट दिली होती.या क्लिनचीटनंतर आता योगेश कदम यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही”, असे म्हणत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Yogesh kadam
Yogesh kadam
advertisement

एक सुनावणी गृह राज्यमंत्र्‍यांनी घेतली होती. पण शस्त्र परवाना दिलाच गेला नाही.पोलीस आयुक्तांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.त्यामुळे परवाना दिला गेला नाही. परवाना दिला असता तर अशाच प्रकारचा आरोप योग्य होता, पण परवाना दिला गेला नाही,त्यामुळे योगेश कदम यांना दोषी ठरवता येणार नाही,असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिनचीट दिली होती.

advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचीटनंतर आता योगेश कदम यांनी ट्वीट करून विरोधकांचा समाचार घेतला आहे.

advertisement

२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.

पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला.

advertisement

तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार!

गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

advertisement

दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती.

असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

शेवटी असंच म्हणावं वाटतं की,“छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही,असे म्हणत योगेश कदम यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Yogesh Kadam : मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचीट मिळताच योगेश कदमांचं ट्वीट,थेट विरोधकांना सुनावलं, 'छोटी मोठी वादळं उठली म्हणून...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल