नाशिक : एकीकडे महंत रामगिरी महाराजांविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झालेला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला पोहोचले आहेत. नाशिकजवळच्या शहा पांचाळे येतील हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. महंत रामगिरी महाराजांविरोधात अहमदनगर आणि संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे.
महंत रामगिरी महाराज यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुस्लिम समाजानं अहमदनगर इथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला आणि रास्ता रोकोही करण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे.
advertisement
महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली. महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी घेऊन जमाव सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
दुसरीकडे येवल्यामध्ये महंत रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 299 अंतर्गत रामगिरी महाराजांविरोधात येवल्यात गुन्हा दाखल झाला आहे.