समोर आलेल्या माहितीनुसार, केज न्यायालयाच्या आवारात सन 2023 मध्ये जुन्या शेतीच्या वादातून सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने डॉ.संभाजी वायबसे याच्या सांगण्यावरून आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं नमूद केलंय. सोबत रक्तबंबाळ अवस्थेतील काही फोटो आणि व्हिडिओ देखील दिले आहेत. दरम्यान डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नी ॲड. सुरेखा वायबसे हे वारंवार धमक्या देत असून जगणे अवघड झाले आहे.तर कुटुंब दहशतीखाली असल्याचं देखील म्हटलंय.
advertisement
लोखंडी रॉडने मारहाण
तर संतोष देशमुख खून प्रकरणात डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नीची चौकशी होऊन त्यांचे नाव येऊन सुद्धा त्यांचे काहीही झाले नाही. 'तू त्यांच्या नादी लागू नकोस नाहीतर तुझाही संतोष देशमुख केल्याशिवाय राहणार नाही' अशी धमकी जून महिन्यात प्रमोद डोईफोडे आणि दिपक डोईफोडे यांनी दिली. लोखंडी रॉडने हल्ला केल्याचं देखील या तक्रारीत नमूद आहे. तर 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचं देखील रामहरी वायबसे यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.
कोण आहे संभाजी वायभसे?
संभाजी वायभसे हा स्वतःचा हॉस्पिटल बीड शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे, ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला. संभाजी वायभसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील आहे.