TRENDING:

panvel news : रक्षाबंधनच्या दिवशी दोघांचे मृतदेह घरी आले, डोंगरावर फिरायला गेलेल्या मामा-भाच्यावर काळाचा घाला

Last Updated:

पनवेल तालुक्यातील आदई धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागील बाजूने चढलेले दोघेजण खाली पडले आणि यात दोघा जणांचा मृत्यू झाला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रमोद पाटील, प्रतिनिधी
(पनवेलमधील घटना)
(पनवेलमधील घटना)
advertisement

पनवेल, 31 ऑगस्ट : बहिणी भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा झाला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मामाच्या गावी येणे एका भाच्याच्या जीवावर बेतलं आहे. मामा आणि भाचा दोघेही डोंगरावर फिरायला गेले आणि तोल जाऊन खाली पडले. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील आदई धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागील बाजूने चढलेले दोघेजण खाली पडले आणि यात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. प्रदीप कामी (वय 7) आणि पारस बाकी (वय 30 ) अशी मृतांची नाव आहे. दोघेही राहणार सुकापुर पनवेल येथील असून नात्याने ते दोघे मामा भाचे होते.

advertisement

(दीड वर्षांच्या मुलीला विमानात अटॅक, नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, 10 डॉक्टर.. तरीही झुंज अपयशी)

पनवेलपासून अवघ्या 2 किलोमीटरवर असलेला आदई धबधबा सध्या पर्यावरणप्रेमींना खुणावतोय. येथील डोंगराळ भाग आणि त्यात पडणारा धबधबा मनशांती देऊन जातो. याच आदई धबधबाच्या डोंगरावर बुधवारी रक्षाबंधनच्या दिवशी 7 जण फिरायला गेले होते. पाठीमागील बाजूने डोंगरावर चढताना दोघेजण पाय घसरून खाली पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

advertisement

(मानसभावाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून...; रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी मुंबईतील भयंकर घटना)

हद्दीत असलेल्या खांदेश्वर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि दोघांना रुग्णालयात पुढील सोपस्कारासाठी नेलं. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या धबधब्यावर पाऊस जसा वाढेल तसं येथील पाणी वाढतं आणि धोकाही वाढतो. या धबधब्याच्या पाण्यात काही ठराविक दिवस छोटे दगडसुद्धा वाहून येतात. त्यामुळे थोडी सावधानता बाळगणे आवश्यक ठरते. यापूर्वी देखील या धबधबा परिसरात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यास खांदेश्वर पोलिसांनी मनाई केली आहे. तरी देखील काही पर्यटक या ठिकाणी जातात आणि आपला अनमोल जीव गमावतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
panvel news : रक्षाबंधनच्या दिवशी दोघांचे मृतदेह घरी आले, डोंगरावर फिरायला गेलेल्या मामा-भाच्यावर काळाचा घाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल