मानसभावाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून...; रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी मुंबईतील भयंकर घटना

Last Updated:

मानसभावाची निर्घृण हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
मुंबई, 30 ऑगस्ट :  30 ऑगस्ट... रक्षाबंधनाचा उत्साह होता. बहीण-भावाच्या नात्याचा हा सण. बहीण भावाला राखी बांधते आणि त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देते किंवा प्रार्थना करते. पण रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच मुंबईत भयंकर घटना घडली. मानसभावाची निर्घृण हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मानलेल्या भावाच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आहेत.
चेंबूरमधील ही घटना आहे. 17 वर्षीय मुलाची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आहेत. एका व्यक्तीने ही हत्या केली आहे. माहितीनुसार व्यक्तीची पत्नी आणि त्याच्या मेहुणीची हा मुलगा छेड काढत होता. त्याचाच राग त्या व्यक्तीला आला आणि त्याने त्याचे हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे केले. हे तुकडे आरोपीने आपल्याच घरात ठेवले होते.
advertisement
अखेर त्यानेच पत्नीला हत्येबाबत माहितीही दिली. त्यानुसार पोलिसात गुन्हा नोंदवला गेला आणि आरसीएफ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत हा आरोपीच्या पत्नीचा मानलेला भाऊ होता.
बीडमध्ये सख्ख्या भावाचाच काटा काढला
बीडमध्येही भावाने भावाची हत्या केली आहे. मित्रांच्या मदतीनं सख्ख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मनोहर पुंडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोमवारी गेवराई शहराजवळील मनारवाडी शिवारात मनोहर पुंडे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला आहे.
advertisement
मनोहर पुंडे याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी जवळ पैसे नसल्यानं तो दुसऱ्याकडून व्याजानं पैसे घेत होता. त्या पैशांमधून तो दारू पीत होता. मात्र हे पैसे त्याच्या लहान भावाला परत करावे लागत होते. सतत व्याजाचे पैसे भरावे लागत असल्यानं याला कंटाळून आरोपी दर्शन पुंडे यांनं आपल्या मोठ्या भावाचा मित्रांच्या मदतीनं खून केला.
मराठी बातम्या/क्राइम/
मानसभावाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून...; रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी मुंबईतील भयंकर घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement