Nagpur News : दीड वर्षांच्या मुलीला विमानात अटॅक, नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, 10 डॉक्टर.. तरीही झुंज अपयशी

Last Updated:

Nagpur News : नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करुन जीव वाचवलेल्या मुलीचा संघर्ष अखेर संपला आहे.

नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर, 31 ऑगस्ट : दोन दिवसांपूर्वी विस्तारा एअरलाईन्सच्या बेंगळुरू ते दिल्ली विमानात प्रवास करणाऱ्या 14 महिन्यांच्या मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने आपात्कालीन लँडिंग करुन तिचा जीव वाचवण्यात आला होता. मुलगी विमानातच बेशुद्ध पडली होती. नागपुरातील किंग्सवे रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर तिची झुंज अपयशी ठरली.
झुंज अखेर अपयशी
रविवारी बंगळुरूवरून दिल्ली जाणारी विस्तारा एअरलाइन्सची फ्लाइट यूके-814 मध्ये बांगलादेशच्या या मुलीची प्रकृती अचानक बिघडली. ती सियानोटिक आजाराने ग्रस्त होती. त्याचवेळी विमानात दिल्ली एम्सचे पाच डॉक्टर प्रवास करत होते. त्यांनी पुढाकार घेत प्राथमिक उपचार करत मुलीचे प्राण वाचवले. विमान नागपूर विमानतळाच्या हद्दीत येताच इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली. परवानगी मिळताच विमान उतरविण्यात आले. उपचारादरम्यान मुलीला 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला होता.
advertisement
विमान नागपूरला उतरवल्यानंतर, नागपुरातील किंग्सवे रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या 10 जणांची टीम तिच्यावर उपचार करत आहे. मात्र, तिची प्रकृती गंभीर होऊन मृत्यू झाला.
त्या दिवशी विमानात काय घडलं?
रविवारी विस्तारा एअरलाइन्सच्या UK-814 फ्लाइटमध्ये ही घटना घडली. डॉ नवदीप कौर म्हणाल्या, "टेक ऑफनंतर सुमारे अर्ध्या तासाने, आम्हाला केबिन क्रूकडून तातडीचा ​​कॉल आला, ज्यामध्ये जहाजावर कोणी डॉक्टर उपलब्ध आहे का ते विचारले." जन्मजात हृदयविकाराचा त्रास असलेल्या या 16 महिन्यांच्या मुलीला विमान प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि ती बेशुद्ध झाली.
advertisement
भूलतज्ज्ञ आणि अतिदक्षता तज्ज्ञ म्हणून, डॉ. कौर यांनी परिस्थितीची जबाबदारी घेतली आणि चार डॉक्टरांच्या टीमसह मुलीला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. "आम्ही क्रू सदस्यांना त्यांची सर्व वैद्यकीय उपकरणे आणण्यास सांगितले." त्यानंतर अथक प्रयत्न करुन मुलीचे प्राण वाचवण्यात आलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur News : दीड वर्षांच्या मुलीला विमानात अटॅक, नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, 10 डॉक्टर.. तरीही झुंज अपयशी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement