धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात प्रसिद्ध असलेला बाराते यांचा वडापाव हा अगदी 35 वर्षांपासून प्रसिद्ध आहे. 1974 ला एकनाथराव बाराते यांनी गुळाचा चहा आणि पकोडे, भजीचे हॉटेल सुरू केले. तेव्हापासून चालू असणारा हा हॉटेलचा व्यावसाय आजतागायत सुरू आहे. तर मागील 35 वर्षांपासुन वडापावचा व्यवसाय आजतागायत सुरू आहे.
सध्या हा व्यवसाय विठ्ठल बाराते आणि त्यांचे वडील राजाभाऊ बाराते हे पाहतात. तर वडापावच्या व्यवसायातून दिवसाकाठी याठिकाणी सहा ते सात हजार रुपयांची उलाढाल होते. तर महिन्याकाठी दोन लाख रुपयांची उलाढाल होते. पण या वडापावच्या व्यवसायाबरोबरच तिसऱ्या पिढीमध्ये शिवभक्तीची परंपरा चालत आली आहे.
advertisement
रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! धान्याचा लाभ हवा असेल तर eKYC बंधनकारक, नवीन नियमावली काय?
वडापावच्या व्यवसायातून दररोज शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम विठ्ठल बाराते हे गडदुर्ग संवर्धनासाठी आणि गडदुर्ग स्वच्छतेसाठी वापरतात. आतापर्यंत त्यांनी 200 हून अधिक गडदुर्ग मोहीम काढून त्या ठिकाणी दिशादर्शक फलक तटबंदी आणि बुरजांवरील वृक्षतोड त्याचबरोबर पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स गोळा करण्याचे काम केले आहे. वडापावच्या व्यवसायासोबत शिवभक्तीची सांगड घालणारे विठ्ठल बाराते यांना वडापावच्या व्यवसायात आई, वडील, भाऊ,पत्नी, वहिनी, व भाचा यांची मदत होते.
50 वर्षांपासून बाराते यांचे हॉटेल प्रसिद्ध झाले आहे. वडापाव विक्रीच्या पैशातून काही रक्कम ही गडदुर्ग संवर्धनासाठी देतात. विठ्ठल बाराते यांचा हा आदर्श निश्चित अनेकांनी घेण्यासारखा आहे. कारण गड किल्ल्यांचे संवर्धन झाले तरच पुढच्या पिढीला पण इतिहासाचा वारसा अभिमानाने सांगू शकतो. मात्र, अगोदर, आपले घर प्रपंच, नोकरी किंवा व्यवसाय बघुनच शिवभक्ती करावी, असेही विठ्ठल बाराते यानी लोकल18 शी बोलताना सांगितले.