रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! धान्याचा लाभ हवा असेल तर eKYC बंधनकारक, नवीन नियमावली काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
रेशन दुकानातून धान्य घेणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्त्तीस ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत रेशन दुकानावर धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. धान्याचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी या लाभार्थ्यांना ही केवायसी करणे बंधनकारक करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात एकूण 4 लाख शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी केवळ 40 हजार लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली आहे. त्यामुळे उरलेल्या लाभार्थ्यांची ई केवायसी करून घेण्याचे आव्हान पुरवठा विभागाकडे आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून रेशन दुकानावर लाभार्थ्यांना ई केवायसी करता येणार आहे.
advertisement
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात येते. या लाभार्थीचे आधार शिधापत्रिकाधारकांना देण्यासाठी 'ई- केवायसी' मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या सुरळीत धान्य वाटप सुरू आहे. मात्र, वितरणातील गोंधळ थांबवण्यासाठी ई-केवायसी करण्याची ही मोहीम सुरू केली आहे. शिधापत्रिका धारकांना ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
advertisement
रेशन दुकानात करता येते ई-केवायसी
रेशन दुकानातून धान्य घेणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्त्तीस ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. लाभार्थ्यांनी ज्या दुकानातून धान्य मिळते, त्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. रेशनकार्ड धारकांना नवीन ई-पॉस मशीन दिल्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेने वेग घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 40 हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.
advertisement
नागरिकांनी ई-केवायसी करावी -
advertisement
शासनाकडून धान्य घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थीची ई-केवायसी प्रक्रिया करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यातदेखील ही प्रक्रिया सुरूकरण्यात आलेली आहे. नागरिकांनी रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी केलं आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 22, 2024 4:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! धान्याचा लाभ हवा असेल तर eKYC बंधनकारक, नवीन नियमावली काय?