धाराशिव : एखादा व्यवसाय सुरू केल्यावर जर सातत्याने आणि निष्ठेने, मेहनतीने तो व्यवसाय केला तर व्यक्ती यशस्वी होतो. त्या व्यवसायाला प्रसिद्धीसह प्रतिष्ठाही प्राप्त होतो. आज अशाच एका व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची यशस्वी कहाणी जाणून घेणार आहोत.
54 वर्षांपूर्वी रवी शिंदे व किरण शिंदे या दोघा बंधूंच्या आजोबांनी मराठा खानावळ नावाने भूम शहरात हॉटेल चालू केले. आज हॉटेल चालवणारी ही त्यांची तिसरी पिढी आहे. काळानुरूप त्यांनी हॉटेल व्यवसायात बदल केला. आता ते शुद्ध शाकाहारी हॉटेल चालवत आहेत. तिसऱ्या पिढीतील शिंदे बंधूही हॉटेल व्यवसायात आहेत.
advertisement
हॉटेल चालवताना ते अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करतात. त्यांच्याकडे हॉटेलमध्ये स्वीट सेक्शनही आहे. या स्वीट सेक्शनमध्ये असलेले गुलाब जामुन, फरसाण, पेढा, कलाकंद, असे अनेक पदार्थ ते स्वतः तयार करतात. त्याचबरोबर हॉटेलची बासुंदी आणि राईस प्लेटही आहे.
रवी शिंदे यांच्या आजोबांनी मराठा खानावळ नावाने शाकाहारी व मांसाहारी हॉटेल 54 वर्षांपूर्वी सुरू केले होते. आज रवी शिंदे हे हॉटेलचा व्यवसाय पाहत असून त्यांनी या हॉटेलचे रूपांतर शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये केले आहे. या माध्यमातून याठिकाणी दिवसाकाठी पाच ते सहा हजार रुपयांची उलाढाल होते. तर महिन्याकाठी पावणेदोन लाख रुपयांची उलाढाल होते. त्यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे, असे रवी शिंदे यांनी सांगितले.
याठिकाणी हॉटेलमध्ये स्वच्छता, टापटीपपणा, आरओचे पाणी, अशा अनेक सुविधा पाहायला मिळतात. काळानुरूप त्यांनी व्यवसायात बदल केला. अगोदर मांसाहारी आणि शाकाहारी हॉटेल चालवले. आता ते शुद्ध शाकाहारी हॉटेल चालवत आहेत. त्यासोबत त्यांनी 7 ते 8 जणांना हॉटेल व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.