म्हणून फिरवला रोटावेटर
देवेंद्र डिसले यांनी सव्वा एकर पपईची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना जवळपास एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला. पपईची चांगली जोपासना केली. वेळेवर फवारण्या केल्या. खतांच्या मात्रा दिल्या. त्यामुळे पपईच्या झाडाची चांगली सेटिंगही झाली. एका झाडाला 60 ते 70 किलो भरतील इतक्या पपया लगडल्या. परंतु 25 रुपये किलो विक्री होणारी पपई एक ते दोन रुपये किलो दराने विक्री होऊ लागली. त्यामुळे हवालदील झालेल्या देवेंद्र डिसले यांनी पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला.
advertisement
50 रुपये किलोचा कांदा थेट 15 रुपयांवर, निर्यात बंदीमुळे शेतकरी संकटात, Video
लाखांचा खर्च उत्पन्न काहीच नाही
पपईसाठी लाखापेक्षा जास्त खर्च झाला. सध्या पपईचे बाजार भाव पडले आहेत. पपईला एक ते दोन रुपये किलोचा बाजार भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांना बोलूनही प्रतिसाद मिळत नाही. स्वत: पपई काढून बाजारात नेली तर वाहतूक खर्चही निघाला नाही. हाती रुपयाही लागला नाही उलट वाहतूक खर्च देण्याची वेळ आली. त्यामुळे बागेवर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे डिसले सांगतात.
युवा शेतकऱ्यानं सुरू केला जोडधंदा, वर्षाकाठी तब्बल 22 लाखांची कमाई, Video
लाखाचं पीककर्ज अंगावर
शेतीसाठी एक लाखाचं पीक कर्ज घेतलं होतं. बँकेचा त्यासाठी तगादा सुरू आहे. मात्र, पपईची बाग फेल गेल्यानं पैसे कुठून भरायचे याची चिंता आहे. त्यात पुन्हा मशागतीचा खर्च करावा लागणार आहे. नव्या पिकासाठी बाग मोडली. यात काही परवडलं नाही. सरकारने शेतकऱ्याकडं लक्ष द्यावं, असं डिसले म्हणतात.