TRENDING:

Dharashiv News : एकेकाळी महिन्याला मिळायचे 700 रुपये, कामगार म्हणून काम केलेला व्यक्ती बनला मालक, महिन्याला इतक्या रुपयांची उलाढाल

Last Updated:

700 रुपये महिना पगारावर काम केलेला तरुणाने ज्याठिकाणी काम केले तोच व्यवसाय चालवायला घेतला. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल, मात्र, आता हाच व्यक्ती या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याकाठी 70 ते 80 हजार रुपयांची उलाढाल करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव : 700 रुपये महिना पगारावर काम केलेला तरुणाने ज्याठिकाणी काम केले तोच व्यवसाय चालवायला घेतला. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल, मात्र, आता हाच व्यक्ती या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याकाठी 70 ते 80 हजार रुपयांची उलाढाल करत आहे. आज जाणून घेऊयात, ही यशस्वी कहाणी.

राहुल साबळे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी सेतू सुविधा केंद्रामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कामाला सुरुवात केली. आता तेच सेतू सुविधा केंद्र ते चालवत आहेत आणि त्यातून त्यांना दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुपयांची उलाढाल होते आहे.

advertisement

1 ऑगस्टपासून करता येणार पीक पेऱ्याची नोंदणी, शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी?, मोबाईलवरच भरता येणार माहिती..

धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील राहुल रामदास साबळे या तरुणांना 2003 पासून ते 2018 पर्यंत सेतू सुविधा केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम केले. त्यावेळी त्यांना महिन्याकाठी 700 रुपये महिना पगार मिळत होता. 700 रुपये महिन्याने काम केलेल्या राहुल साबळे यांनी आहे त्या ठिकाणी सातत्यपूर्ण काम केले आणि 2019 नंतर तेच सेतू सुविधा केंद्र त्यांनी चालवायला घेतले.

advertisement

आता त्यांना दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुपये अशाप्रकारे महिनाभरात 70 ते 80 हजार रुपयांची उलाढाल करत आहेत. आता त्यांच्याकडे 4 कामगार काम करत आहेत. स्वतः कामगार म्हणून काम केलेल्या राहुल साबळे यांना व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

खुराकसाठीही नव्हते पैसे, पण देशासाठी मिळवले सुवर्णपदक; कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या मुलीची प्रेरणादायी कहाणी

advertisement

त्यांच्या सेतू सुविधा केंद्रात त्यांनी पासपोर्ट साईज फोटोचे शॉप ऑनलाइन कागदपत्रे, आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्याठिकाणी कामगार म्हणून काम केले तेच सेतू सुविधा केंद्र चालवायला घेतले आहे आणि त्यातून चांगली आर्थिक उलाढाल होत आहे, अशी प्रतिक्रिया राहुल साबळे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : एकेकाळी महिन्याला मिळायचे 700 रुपये, कामगार म्हणून काम केलेला व्यक्ती बनला मालक, महिन्याला इतक्या रुपयांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल