धाराशिव : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान मिळते. यासाठी फळबाग लागवड करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांनी स्वतःची नोंदणी करून घ्यावी.
या योजनेमध्ये देण्यात येणारे अनुदान हे तीन वर्षात देण्यात येते. त्यामध्ये पहिल्या वर्षी 50% दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येते. या योजनेचे निकष काय आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा करावा?, संपूर्ण माहिती एका क्लिकवर..
- या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे.
- जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी विहित प्रपत्रातील संमतीपत्र आवश्यक राहील.
- जमीन कुळकायद्याखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.
भारतीय सैन्यदलासाठी स्पेशल बुलेट प्रूफ जॅकेट तयार, AK-47 ही यापुढे होणार फेल, काय आहे यात असं विशेष?
- यापुर्वी महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती महाईबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करु शकतात आणि अशाप्रकारे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, धाराशिव जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी केले आहे.