TRENDING:

दिव्यांगावर मात! ते हॉटेल चालवतात जोमात, त्यांच्या हातची चव चाखायला येतात खवय्ये

Last Updated:

शेतकरी, व्यापारी बाजाराला येताना भाकरी घेऊन येतात. मग सचिनच्या हॉटेलमधून भाजी किंवा आमटी विकत घेतात. इथली भाजी प्रचंड प्रसिद्ध आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव : हाताला चव असेल तर रोजगार कुठेही जात नाही, शिवाय आपण बनवलेल्या पदार्थांनी इतरांचं पोट भरणं यापेक्षा मोठं पुण्य नाही असं म्हणतात. व्यावसायिकदृष्ट्या विचार केल्यास पदार्थांची चव बेस्ट असेल तर अन्नपदार्थ विक्रीतून नफा होतोच. हेच सिद्ध करून दाखवलंय धाराशिवच्या सचिन यांनी.

धाराशिव जिल्ह्यातील वालवडचा जनावरांचा बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. इथं दूरदूरहून शेतकरी आणि व्यापारी येतात. विशेष म्हणजे एकदा का बाजारात आले की अनेकजण इथल्या सचिनच्या हॉटेलमधील झणझणीत आमटीचा आस्वाद घेतात. ही आमटी खाण्यासाठी खवय्ये खास आपापल्या घरून भाकरी घेऊन येतात.

advertisement

हेही वाचा : आई करायची धुणीभांडी, तर वडील होते कॅन्टीनमध्ये; पण मुलानं करुन दाखवलं, चेंबूरमधील हॉटेलची सर्वत्र चर्चा

वालवडच्या जनावरांच्या आठवडी बाजारात सचिन मेंगडे यांचं जेवणाचं हॉटेल आहे. आजोबांनी सुरू केलेलं हॉटेल चालवणारी आता त्यांची ही तिसरी पिढी. सचिन हे दिव्यांग आहेत. ते व्यवस्थित चालू शकत नाहीत, मात्र तरीही त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय बंद पडू नये यासाठी हॉटेल मोठ्या जिद्दीनं सुरू ठेवलंय. दर सोमवारी वालवड इथं भरणाऱ्या आठवडी बाजारात ते स्वादिष्ट खाद्यपदार्थांची विक्री करतात. त्यातून त्यांची दिवसभरात 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होते. या व्यवसायात त्यांना पत्नीची मोलाची साथ मिळते.

advertisement

वालवडचा जनावरांचा बाजार हा सकाळी 7 वाजता सुरू होतो. अनेक शेतकरी आणि व्यापारी या बाजाराला येताना घरून भाकरी घेऊन येतात. मग सचिन यांच्या हॉटेलमधून भाजी किंवा आमटी विकत घेतात. इथली भाजी प्रचंड प्रसिद्ध आहे. हॉटेल महिन्याभरात केवळ चारच दिवस चालतं. परंतु ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. दरम्यान, सचिन हे इतर दिवशी स्वयंपाक बनवण्याचं काम करतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
दिव्यांगावर मात! ते हॉटेल चालवतात जोमात, त्यांच्या हातची चव चाखायला येतात खवय्ये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल