धाराशिव : गोगलगायींमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांचा प्रतिबंध करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. एक गोगलगाय 100 ते 400 अंडी घालते. त्यामुळे गोगलगायींचं नियंत्रण न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून नेमके काय उपाय करावे, हे आपण आज जाणून घेऊयात.
रासायनिक उपाययोजना -
रासायनिक उपाययोजना करीत असताना सोयाबीनच्या उगवणीनंतर बांधाव्यतिरिक्त शेतामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असेल तर प्रत्येक चार ओळीनंतर ओळीच्या बाजूने पाच फूट अंतरावर स्नेलकील औषधाच्या गोळ्या टाकाव्यात. त्यानंतर नियंत्रण येत नसेल तर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी स्पिनोसॅड कीटकनाशक 4 मिली + आयर्न फॉस्पेट 2 किलो प्रति एकर वापरल्यास याचा सर्वाधिक परिणामक दिसुन येतो. यामुळे गोगलगायींवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
advertisement
जालन्यातील धक्कादायक वास्तव, महापालिकेची शाळा भरते चक्क मंगल कार्यालयात, एक वर्ग वराच्या खोलील तर…
बिना खर्चिक नियंत्रण मिळवायचे असेल तर सोयाबीन रोप अवस्थेत असताना रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना गुळाच्या पाण्यात भिजवून प्रति एकरी दहा ठिकाणी तुम्हाला वाट्टेल तिथे ठेवावा.
सकाळी सहा ते आठच्या दरम्यान ढीगाखाली किंवा बारदानाखाली जमा झालेल्या गोगलगायी हातामध्ये हातमोजे किंवा प्लास्टिकची पिशवी खालून गोळा कराव्यात आणि साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोणपाट खाली जमा झालेल्या गोगलगायी सामूहिक रित्या हातमोजे घालून हाताने गोळा करून त्यावर मीठ किंवा चुना टाकून नष्ट कराव्यात.
संशोधक विद्यार्थ्यांचं कौतुकास्पद कार्य, पुरंदर किल्ल्यावर केलं मोठं काम
कृषी विभागाचे महत्त्वाचे आवाहन -
गोगलगायींचा प्रादुर्भाव सुरू झाल्यास शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते तर यासाठी अधिक माहिती हवी असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच सोयाबीनवरील गोगलगायींच्या प्रादुर्भावा संदर्भात कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.