संशोधक विद्यार्थ्यांचं कौतुकास्पद कार्य, पुरंदर किल्ल्यावर केलं मोठं काम
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात सारथीकडून सध्या एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : नुकताच 350 वा राज्यभिषेक दिन सोहळा पार पडला. याच निमित्ताने मराठवाड्यातील संशोधक विद्यार्थ्यानी एकत्र येत कौतुकास्पद कार्य केले. या सर्वांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी सीडबॉलचे बीजारोपण केले. त्यामध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल 13 हजार 350 सीडबॉलची लागवड करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या रान बियादेखील आहेत. जसे की आंबा, कडूलिंब, बाभूळ इ.
advertisement
छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि मानव विकास संस्था अर्थात सारथीकडून सध्या एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तब्बल 13 हजार सीडबॉलचे पुरंदर किल्ल्यावर बीजारोपण केले. या उपक्रमात सारथीचे संशोधक विद्यार्थी अमोल देशमुख, राणी मतसागर, नर्मदा तांगडे आणि वीरराजे अशोकराव म्हसलकर तरुणांनी उपक्रमात सहभाग घेतला.
advertisement
जालन्यातील धक्कादायक वास्तव, महापालिकेची शाळा भरते चक्क मंगल कार्यालयात, एक वर्ग वराच्या खोलील तर…
आपल्या सगळ्यांना झाडाचे महत्व माहिती आहे. हिच झाडे आपल्याला शुद्ध हवा, पाणी देत असतात आणि त्यांचे महत्व लक्षात घेऊन आज झाडे लावणे किती गरजेचे आहे, हा विषय लक्षात घेऊन आम्ही या पुरंदर किल्ल्याची संपूर्ण माहिती घेत परिसराचा अभ्यास करत त्याठिकाणी आंबा, कडूलिंब, बाभूळ, सुबाभूळ, सीताफळ, रामफळ, जांभूळ इ. बियाचे सीडबॉलच्या माध्यमातून लागवड करण्यात आली.
advertisement
वस्तुस्थिती पाहता सीडबॉल, मातीचे गोळे, 'बीज गोळे' ही जी संकल्पना आहे, ती पक्षांच्या विष्ठेतून निर्माण झालेली आहे. वन्यपक्षी, प्राणी रानातील झाडावरील फळे खायची आणि त्यांच्या विष्ठेतून काही झाडांना अंकुर येऊन रोपांचे निर्माण होत असे. या विषयाला आधारभूत करून सीडबॉल ही संकल्पना जन्माला आली आहे.
advertisement
सीडबॉल तयार करण्यापूर्वी प्रामुख्याने पाच गोष्टी खूप महत्त्वाची भुमिका पार पाडतात. एक म्हणजे काळी माती, दोन म्हणजे कंपोस्ट खत, तीन म्हणजे कोकोपीट, चार म्हणजे पाणी आणि पाच म्हणजे वन्य सावली देणाऱ्या रान झाडांच्या बिया, यामध्ये पाहायला मिळतात, अशी माहिती सारथीचे संशोधक विद्यार्थी वीर म्हसलकर यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 25, 2024 4:25 PM IST