लहान मुलांसाठी बजेट फ्रेंडली बॅग हव्यात, तर इथे या, अगदी कमी किमतीत मिळेल चांगली वस्तू

Last Updated:

प्रत्येकाला वाटते की आपल्या मुलांना त्यांच्या आवडीची बॅग मिळावी. त्यामुळे तुम्हालाही जर तुमच्या आवडीची बॅग हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

+
मुलांसाठी

मुलांसाठी चांगल्या स्कूल बॅग्स

प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच पालक आपल्या मुलांसाठी नवीन स्कूल बॅग खरेदी करण्याचा विचार करतात. तसेच बाजारात गेल्यावर मुलांचे शालेय शिक्षण साहित्य खरेदी करण्यासाठीही गर्दी असतेच. त्यात शालेय गणवेशापासून ते अगदी शुज खरेदी करण्यातही पालक व्यस्त असतात. पण यामध्ये मुलांची शाळेची बॅग हा त्यांचा आवडता विषय आहे.
advertisement
प्रत्येकाला वाटते की आपल्या मुलांना त्यांच्या आवडीची बॅग मिळावी. त्यामुळे तुम्हालाही जर तुमच्या आवडीची बॅग हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अंधेरी जे. बी. नगर मार्केटमध्ये अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे 250 रुपयांपासून विविध प्रकारच्या डिझाईन्स असलेल्या बॅग मिळतात आहे. याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट.
जालन्यातील धक्कादायक वास्तव, महापालिकेची शाळा भरते चक्क मंगल कार्यालयात, एक वर्ग वराच्या खोलील तर…
लहान मुलींसाठी खास प्रिन्सेस प्रिंट असलेली स्कूल बॅग याठिकाणी उपलब्ध आहे. या बॅगमध्ये दोन मेन कम्पार्टमेंट आहेत. त्यामुळे वह्या-पुस्तकं, कॅलेंडर, क्लिप पॅड अशा सर्व वस्तू नीट ठेवता येतात. यात बॉटलसाठीही दोन कप्पे दिले आहेत. या बॅगची किंमत ही 250 रुपये आहे. तर यासोबतच तुम्ही मुलांसाठी क्यूटशी कार्टून बॅगही घेऊ शकता. सॉफ्ट मटेरिअलच्या या बॅग्स वजनाला अगदी हलक्या आहेत. त्यामुळे लहान मुलांसाठी त्या फारच सोयीच्या आहेत.
advertisement
अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी शोधली लाखो रुपयांच्या दागिन्यांची बॅग, कल्याण रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं? 
यात मुलांच्या आवडीनुसार अनेक डिझाइन्सचे पर्याय आहेत, जसे की स्पायडर मॅनची डिझायनर बॅग, छोटा भीमची कार्टून बॅग. असे अनेक प्रकार आहेत. या बॅगची किमत 300 रुपयांपासून सुरुवात होत आहे. तसेच थोड्या मोठ्या मुलांसाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठीही बॅग परफेक्ट आहे.
advertisement
यात तीन मोठे कम्पार्टमेंट असल्याने बरंचसं सामान नीट ऑर्गनाइझ करून ठेवता येतं. यात पुढच्या बाजूला असलेला छोटा कप्पा सोयीचाही आहे आणि त्यामुळे बॅगेला कुल ट्रेंडी लुकही मिळतो. या बॅगची किंमत 350 रुपयांपासून आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लहान मुलांसाठी बजेट फ्रेंडली बॅग हव्यात, तर इथे या, अगदी कमी किमतीत मिळेल चांगली वस्तू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement