धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील पारगाव हे धुळे सोलापूर महामार्गावर आहे. मात्र, बीड आणि धाराशिव दोन्ही जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दूर अंतरावर असलेला हा ग्रामीण भाग असल्याने शेती उपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना दूर जावे लागायचे. शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य स्वस्तात मिळावे यासाठी एका व्यक्तीने व्यवसाय सुरू केला.
तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शेती उपयोगी साहित्याचा हा व्यवसाय आज चांगला भरभराटीला आला आहे. सुरुवातीला दोन ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक करुन आज हा व्यवसाय यशस्वी झाला आहे. हा व्यवसाय नेमका कुणी सुरू केला, यामागे काय उद्देश्य होता, हे जाणून घेऊयात.
advertisement
जवळ मोठी बाजारपेठ नाही. त्यामुळे बीड किंवा धाराशिव या दोन मोठ्या बाजारपेठा होत्या. त्यासाठी शेती उपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना दूरवर जावे लागायाचे. त्यामुळे पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य स्वस्तात उपलब्ध व्हावे, यासाठी सुरेश लाखे यांनी ॲग्रोवन मार्ट नावाने शेती उपयोगी साहित्याचे दुकान पारगाव येथे तीन वर्षांपूर्वी सुरू केले.
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
त्यासाठी त्यांनी दोन ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. तसेच हा व्यवसाय सुरू केला. आता याठिकाणी शेती उपयोगी साहित्य अल्प दरात मिळत आहे. यामुळे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. तसेच या व्यवसायातून वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
कोणते साहित्य मिळते -
सुरेश लाखे यांच्या समर्थ ॲग्रोवन मार्ट या दुकानात स्प्रे पंप ,जनावरांचे मॅट,आदी शेती उपयोगी साहित्याची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दूर जाण्याची गरज पडत नाही. तर उलट स्वस्त आणी माफक दरात वस्तु मिळत असल्याने शेतकरी खरेदीसाठी गर्दी करीत असतात, अशी माहिती सुरेश लाखे यांनी दिली.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र, कुस्तीपंढरी कोल्हापुरातील कुस्तीपटूंनी घातली ही भावनिक साद, VIDEO
यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तसेच शेतकऱ्यांना कमी दरात चांगल्या वस्तू मिळत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.





