धाराशिव : हायवेवरून प्रवास करीत असताना आपल्याला रंबल स्ट्रीप दिसतात. परंतु, बऱ्याच वेळी रंबल स्ट्रीप म्हणजे काय? रंबल स्ट्रीप वरून गाडी जाताना गाडी कंपन पावते का? रंबल स्ट्रीपचा नेमका उपयोग काय होतो? असे अनेक प्रश्न आपल्या पडतात. त्यामुळे या सर्व प्रश्नाची उत्तरे रंबल स्ट्रीप व्यवस्थापक रविंद्र वर्मा यांनी दिली आहेत.
advertisement
रंबल स्ट्रीप म्हणजे काय?
रंबल स्ट्रीप रात्रीच्या प्रकाशात रिफ्लेक्ट होतात. रंबल स्ट्रीप सुचना देण्यासाठी असतात. रंबल स्ट्रीप तुम्ही महामार्गाने किंवा हायवेने प्रवास करीत असाल तर तुम्हाला रस्त्यावर पांढरे पट्टे ओढलेले दिसतात यालाच रंबल स्ट्रीप असे म्हणतात. वाहन चालकाला सावध किंवा सावधान करण्यासाठी या रंबल स्ट्रीप ओढलेल्या असतात. पुढे रस्ता, गाव, शाळा आधी गोष्टींची सूचना देण्यासाठी या रंबल स्ट्रीप ओढलेल्या असतात, असं रविंद्र वर्मा सांगतात.
दोन हात, एक पायही नाही तरीही एका पायाने करते सर्व कामे, तरुणीचं आयुष्य समाजाला प्रेरणा देणारं
थोडक्यात वाहन चालकाला सूचित आणि सावध करण्याचं काम या रंबल स्ट्रीप करतात. 5 किंवा त्याहून अधिक स्ट्रीप ओढलेल्या असतात. साधारणपणे ऐका वेळी या 5 किंवा त्याहुन अधिक पट्ट्या ओढलेल्या असतात. जवळपास या एका स्टेप्स अंतर एक फुटापर्यंत असतं तर दोन स्ट्रीपच्या मधला अंतर दोन फुटा इतकं असतं, असं रविंद्र वर्मा सांगतात.
कौतुकास्पद! अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचे 52 Video, 'त्या' विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
180 डिग्री तापमानाला थर्मा प्लास्टीक, गरम करून या पट्ट्या ओढल्या जातात. रात्रीच्या अंधारात रिफ्लेक्शन व्हावे यासाठी पट्ट्या ओढतानाच त्यावर ग्लास बेड देखील टाकतात. त्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहनांचा प्रकाश पडला की या स्ट्रीप रिफ्लेक्ट होतात. ऊन वारा पाऊस याचा कोणताही परिणाम या पट्ट्यांवर होत नाही. त्यामुळे पांढऱ्या शुभ्र दिसणारे या पट्ट्या अनेक दिवस टिकतात. रंबल स्ट्रीप वरून गाडी जाताना गाडी कंपन पावत नाही, अशी माहितीही रविंद्र वर्मा यांनी दिली आहे.